Sun, October 1, 2023

अत्याचार प्रकरणी संशयितास कोठडी
अत्याचार प्रकरणी संशयितास कोठडी
Published on : 24 May 2023, 2:55 am
अत्याचारप्रकरणी संशयितास कोठडी
ओरोस ः एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती बनविल्याप्रकरणी कर्नाटकातील गुलबर्गा येथील युवकाला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी अटक केली. येथील विशेष न्यायालयात त्याला हजर केले असता त्याला २६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संशयित हा नातेवाइकांकडे आला होता. २१ ते २२ मार्च दरम्यान त्याने पीडित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. याप्रकरणी तिच्या आईने २२ मे रोजी फिर्याद दाखल केली असून सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आज त्याला अटक करण्यात आली.