सलोखा मंच सर्वत्र हवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलोखा मंच सर्वत्र हवेत
सलोखा मंच सर्वत्र हवेत

सलोखा मंच सर्वत्र हवेत

sakal_logo
By

१२ (टुडे पान ३ साठी, सदर)

(१२ मे टुडे चार)

ग्राहकनामा..........लोगो

-rat२५p१८.jpg ः
२३M०४८७१
विनय परांजपे
----
सलोखा मंच सर्वत्र हवेत

गृहबांधणी व्यवसायाचे नियमन करण्यासाठी २०१६ ला रेरा कायदा आस्तित्वात आला. या कायद्याने एक नियामक प्राधिकरण (महाराष्टात महारेरा) अस्तित्वात आले. सर्व गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी महरेराकडे करणे आणि त्यांच्या मंजुरीनंतरच सदनिका विक्री करता येणे सक्तीचे झाले. सदनिकाधारक, प्रवर्तक आणि रिअल इस्टेट एजंट यांच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी पण नियामक प्राधिकरणावर सोपवण्यात आली. ग्राहक आणि बिल्डर यांच्यातील वादांचे निराकरण करण्याची जबाबदारी आणि अधिकार नियामक प्राधिकरणाला प्राप्त झाले.

---विनय परांजपे, रत्नागिरी
--------

ग्राहकांसाठी ही चांगली व्यवस्था होती आणि आहे. आपली आयुष्यभराची पुंजी खर्च करून जेव्हा एखादा ग्राहक सदनिका घेतो तेव्हा त्यात फसवले न जाता चांगली सदनिका मिळून शांतपणे जगण्याची त्याची साधी अपेक्षा असते; पण सदनिका विकत घेण्याच्या व्यवहारात टायटल, आवश्यक परवानग्या अशा अनेक बाबी असतात ज्या बाबत सामान्य ग्राहक अनभिज्ञ असतो. म्हणून जेव्हा एखाद्या प्रकल्पाची नोंदणी महारेराने केलेली असेल तर ग्राहक निश्चिंत होतो.
महारेराबद्दल गेल्या १५ दिवसात आलेल्या बातम्या मात्र काळजीत टाकणाऱ्या आहेत. ठाणे परिसरात प्रकल्पांच्या बोगस नोंदणी दाखवून सदनिका विक्री केल्यामुळे ६५ गृहप्रकल्पांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकच नोंदणी क्रमांक अनेक प्रकल्पांना दाखवून ग्राहकांना फसवले गेले आहे ही एक बातमी. दुसऱ्या बातमीत असे म्हटले आहे की, रेराकडे तक्रार निवारणाला होणाऱ्या विलंबाला कंटाळून ग्राहक पुन्हा ग्राहकमंचाकडे तक्रार दाखल करत आहेत. (तिथेही विलंब आहेच).
ग्राहकमंचात अनेक तक्रारी दाखल होत असतात. तुलनेने रेराचे काम हे फक्त गृहनिर्माण क्षेत्रातील ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्याचे असल्याने तिथे विलंब व्हायला नको. ग्राहकांच्या तक्रारी सामंजस्याने मिटवण्यासाठी रेरा कायद्याच्या कलम ३२ (ग) मध्ये तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीप्रमाणे ग्राहक संघटना आणि विकासकांची संघटना यांच्या प्रतिनिधींचा समावेश असणाऱ्या सलोखा मंचाची निर्मिती करता येते आणि सामंजस्याने वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. मुंबई महानगरात मुंबई ग्राहक पंचायतीच्या पुढाकाराने असे सलोखा मंच स्थापन झाले आहेत आणि त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे; मात्र असे सलोखा मंच महाराष्ट्रभर स्थापन झालेले नाहीत. महाराष्ट्रात ग्राहक चळवळीविषयी आस्था असणारे कार्यकर्ते सर्वदूर आहेत. बिल्डरांची क्रेडाई ही संघटना पण उत्साही आहे. सर्वांच्या सहकार्याने सर्वत्र सलोखा मंच स्थापन करून ग्राहकांच्या तक्रारींचा जलद निपटारा करणे अगदी सहज शक्य आहे.
जाता जाता ----ग्राहक पंचायत रत्नागिरी आणि क्रेडाई रत्नागिरी यांनी असा प्रस्ताव महारेराला कोविडच्या आधीच सादर केला आहे. त्याला अर्थातच अद्याप प्रतिसाद नाही, पोचही नाही.

(लेखक कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले व ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)