भडकंबा ग्रामपंचायत सदस्य दुधाणेंना जनसेवक पुरकार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भडकंबा ग्रामपंचायत सदस्य दुधाणेंना जनसेवक पुरकार प्रदान
भडकंबा ग्रामपंचायत सदस्य दुधाणेंना जनसेवक पुरकार प्रदान

भडकंबा ग्रामपंचायत सदस्य दुधाणेंना जनसेवक पुरकार प्रदान

sakal_logo
By

४ (पान २ साठी)


-rat२४p११.jpg-
२३M०४७०४
साखरपा : जनसेवक पुरस्कार स्वीकारताना केतन दुधाणे.
-----------

भडकंबा ग्रामपंचायत सदस्य दुधाणेंना पुरकार

साखरपा, ता २५ : भडकंबा ग्रामपंचायत सदस्य केतन दुधाणे यांना जनसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार दुधाणे यांना प्रदान करण्यात आला. केतन दुधाणे हे भडकंबा ग्रामपंचायतीचे सर्वात तरुण सदस्य आहेत. सुशिक्षित आणि युवा चेहेरा म्हणून त्यांनी गेल्या दोन वर्षात ग्रामपंचायतीत आपली ओळख निर्माण केली आहे. विधवा, निराधार महिला यांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवून दिला आहे. विविध शासकीय योजना त्यांनी लाभार्थिंपर्यंत पोचवून त्याचा लाभ गरजूंना दिला आहे. गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप, घरघंटी वाटप त्यांनी केले आहे. नवीन व्यावसायिकांना बँकेतून कर्ज मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. गावात आलेल्या चकरमान्यांची व्यवस्था त्यांनी केली होती. गावात सॅनिटायझेशन, औषधांची विनामूल्य घरपोच सेवा त्यांनी दिली होती. दुधाणे यांच्या ह्या कार्याची दाखल घेत त्यांना जनसेवक पुरस्कार आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.