तेंडोली-रवळनाथ मंदिर रस्ताकामाचे भूमिपूजन

तेंडोली-रवळनाथ मंदिर रस्ताकामाचे भूमिपूजन

swt253.jpg
04919
तेंडोलीः मुख्य रस्ता ते साकव रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

तेंडोली-रवळनाथ मंदिर
रस्ताकामाचे भूमिपूजन
कुडाळः तेंडोली-रवळनाथ पंचायत मंदिर समोरील पिंपळाजवळील मुख्य रस्त्या ते साकव रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन उपसरपंच संदेश प्रभू यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. विद्यमान सरपंच अनघा तेंडोलकर या माजी पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी या रस्त्यासाठी वित्त आयोगाकडे मागणी केली होती. पंचायत समिती स्तरावर पंधरावा वित्त आयोगांतर्गत हा रस्ता मंजूर करण्यात आला. या रस्त्यासाठी दीड लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे भूमिपूजन आज उपसरपंच संदेश प्रभू यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सरपंच तेंडोलकर, ग्रामपंचायत सदस्य आकाश मुणनकर, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र राऊळ, अरविंद तेंडोलकर, मेघःशाम सर्वेकर, सुनील मुणनकर, प्रदीप पेडणेकर, गौरेश राऊळ, तिमाजी राऊळ आदी उपस्थित होते.
.................
दोडामार्गवासीयांचे उपोषण स्थगित
दोडामार्गः दोडामार्ग ते मांगेली फणसवाडी एसटी बससाठी येथील बसस्थानकासमोर मनसेचे माजी तालुकाध्यक्ष सुनील गवस यांनी ग्रामस्थांसह सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी आगार व्यवस्थापक बोधे यांच्या लेखी आश्वासनानंतर व मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर स्थगित करण्यात आले. ही बस एक जूननंतर पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे ग्रामस्थांना देण्यात आले. आंदोलनस्थळी शिवसेना शिंदे गट उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मनसे माजी विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत, पवार आदी उपस्थित होते.
..................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com