वनविभागाकडून आंबेरीत स्वच्छता

वनविभागाकडून आंबेरीत स्वच्छता

वनविभागाकडून
आंबेरीत स्वच्छता
माणगावः पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कुडाळ वनक्षेत्रपाल यांच्यातर्फे आंबेरी येथील श्री देवी भावई मंदिर परिसरामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने साफसफाई करण्यात आली. वनपाल श्रेया परब, वाडोस वनरक्षक सूर्यकांत सावंत, कालेली वनरक्षक समीर खरवत, बाबू आगलावे, सीताराम सावंत, माणगाव वनसेवक गणेश मासंग व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
.............
कोळंब येथे आज
स्त्री शक्ती शिबिर
मालवणः तालुक्यातील कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात उद्या (ता. २६) ''शासन आपल्या दारी'' व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती शिबिराचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती नागरिक व महिलांना देण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिक व महिलांनी उपस्थित राहून योजनांची माहिती घ्यावी तसेच आवश्यक योजनांचे अर्ज भरून लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वैशाली झालटे यांनी केले आहे.
................
सावंतवाडीत कॅरम
प्रशिक्षण शिबिर
सिंधुदुर्गनगरीः सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोशिएशनमार्फत खेळामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी तीन वेळेचे विश्वविजेते योगेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ६ जून या कालावधीत येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा लाभ जिल्ह्यातील उदयोन्मुख कॅरम खेळाडूंनी घ्यावा. अधिक माहितीसाठी असोसिएशनचे सेक्रेटरी योगेश फणसळकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
...............
प्रतिष्ठापना सोहळा
मळगावात उत्साहात
सावंतवाडीः मळगाव पिंपळवाडी येथील स्वामी भवन येथे श्री गणेश आणि स्वामी मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. रविवारपासून (ता. २१) सुरू झालेल्या या तीन दिवसांच्या या धार्मिक सोहळ्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्त मंगलाचरण, पुण्याहवाचन, स्वामींचा स्नानविधी व शय्याधिवास, हवन, श्री गणेश दत्तयाग, स्वामींची महापूजा, महाआरती, गाऱ्हाणे, महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. भजन, गायन, कीर्तन, दशावतारी नाटक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नक्षत्र ज्योतिषीरत्न शंकर राऊळ यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले.
................
रेल्वे आरक्षणाबाबत
सोमवारी बैठक
कणकवलीः दरवर्षी गणेशोत्सवासाठी अवघ्या कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे बुकींग काही मिनिटांत फुल्ल होत असल्याचे प्रकार घडत आहेत. याची दखल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली असून २९ मे रोजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून कोकणवासीयांचा प्रवास सुकर होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार नीतेश राणे यांनी म्हटले आहे.
..............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com