खेड ःसहा गावातील लग्नसोहळ्यातही मोफत पाणी

खेड ःसहा गावातील लग्नसोहळ्यातही मोफत पाणी

कथा आधुनिक भगीरथाची--भाग 2

फोटो ओळी
-rat25p36.jpg ः KOP23M04908 खेड ः चिंचघर सुतारवाडी येथे उद्योजक चव्हाण यांनी दिलेली 5 हजार लिटरची पाणी साठवण टाकी.
-rat25p37.jpg, rat25p38.jpg ः KOP23M04909, KOP23M04910 खेड ः चिंचघर रेवीचीवाडी येथे चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आलेले घरपोच पाण्याचे कनेक्शन.

सहा गावातील लग्नसोहळ्यातही मोफत पाणी

रमेश चव्हण यांचा जलदानाचा संकल्प ; स्वखर्चाने निर्माण केलेत जलस्रोत
सिद्धेश परशेट्ये ः सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ ः देणाऱ्यायाने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे या विं. दा. करंदीकरांच्या या कवितेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उद्योजक रमेश चव्हाण हे समाजकार्य करत आहेत. हंडाभर पाण्यासाठी भांडणे करणारे अनेकजण दिसतात; मात्र या पाणी समस्येवर कायमचा उपाय शोधणारे रमेश चव्हाण हे पाण्याचा धर्म करून समाजासमोर एक आदर्श उभा करत आहेत. मार्च महिन्यापासून चव्हाण यांच्या दस्तुरी या गावासह साखरोली या गावात पाच-सहा ठिकाणी लग्नविधी पार पडले. त्यासाठी चव्हाण यांनी संपूर्ण वऱ्‍हाडी मंडळींसाठी स्वखर्चाने मोफत पाणीपुरवठा केला.
उन्हाच्या काहिलीने जीव कासावीस होत असून, दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. खेड तालुक्याच्या कडेकपारीत वसलेल्या वाड्यावस्त्यावर तीव्र पाणीटंचाई भासत आहे. खेड-दापोली रस्त्यालगत दरवर्षी पावसाळ्यात तुडूंब भरून वाहणारी नारंगी व येलवली नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे पडले आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईवर मात करताना शासनाचीदेखील दमछाक होत आहे; परंतु आपण आपल्याला जितके शक्य असेल तितका पाणीपुरवठा करून पाण्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये ही भावना मनात बाळगून गेली सहा वर्षे टॅंकरच्या माध्यमातून उद्योजक चव्हाण हे लगतच्या वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करत आहेत. यावर्षी त्यांनी मार्च महिन्यात आपल्या जमिनीतून टाकी उभारून लगत असलेल्या वाड्यांना पाच हजार लिटरच्या पाणी साठवण टाक्या पुरवून त्यातून प्रत्येक वाडीतील प्रत्येक घरासाठी पाण्याचा पुरवठा केला आहे. नेहमीच प्रसिद्धीपासून अलिप्त राहणारे रमेश चव्हाण हे नेहमीच विविध समाजकार्यात आजपर्यंत अग्रेसर राहिले आहेत. त्यांनी कोविडच्या काळात अनेक कुटुंबांना सावरले असून, प्रसिद्धीपासून कोसो दूर राहणारी अशी व्यक्तीमत्वे तुरळकच असतात. गेल्या सहा वर्षापासून वाडीवाडीवर पाण्याच्या टाक्या ठेवून त्यामध्ये पाणी देत आले आहेत. आता मात्र स्वतःचे जलस्रोत निर्माण करून त्या माध्यमातून मी जिवंत असेपर्यंत या तहानलेल्या ग्रामस्थांना मी पाणीपुरवठा करणार आहे. त्यासाठी येणारे विजेचे बिल, दुरुस्ती खर्च तसाच नोकरपगार स्वतः करणार असल्याचे सांगत चव्हाण यांनी जणू हा जलदानाचा संकल्प बोलून दाखवला.

कोट
आमच्या गावाला उन्हाळ्यातून पाणीटंचाई जाणवते; मात्र यावर्षी तिची तीव्रता अधिक होती. अशा परिस्थितीत दस्तुरी येथील उद्योजक बावाशेठ चव्हाण यांनी आमच्या साखरोली गावाला पाणीपुरवठा करून खूप मोठी मदत केली आहे. सद्यःस्थितीत आमच्या गावातील एक वाडी सोडली तर संपूर्ण गावाला बावाशेठ चव्हाण यांच्यामार्फत पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे मी समस्त ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे आभार मानते.
---अमृता कदम, सरपंच, साखरोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com