चिपळूण ःगोवळकोटमधील गाळ उपसा थांबवू नका

चिपळूण ःगोवळकोटमधील गाळ उपसा थांबवू नका

फोटो ओळी
-ratchl255.jpg ःKOP23M04913 चिपळूण ः गोवळकोट येथे काढण्यात येणारा गाळ.
-----------------

गोवळकोटमधील गाळ उपसा थांबवू नका

विकास समितीचे साकडे ; ग्रामस्थांची सहकार्याची भूमिका

चिपळूण, ता. 25 ः चिपळूण शहराची महापुरातून मुक्तता होण्यासाठी नाम फाउंडेशनने मोठे योगदान दिले. शिवनदी गाळमुक्त करतानाच वाशिष्ठी नदीही गाळमुक्त होण्यासाठी मोलाची साथ दिली. नामच्या ऋणातून चिपळूणकर कधीच मुक्त होऊ शकत नाहीत. गोवळकोटमधील काही मोजक्या लोकांमुळे गैरप्रकार घडला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. नाम फाउंडेशनने यापुढेही वाशिष्ठी नदीत गोवळकोट येथे सुरू असलेले काम न थांबवता पुन्हा सुरू करावे. त्याला ग्रामस्थांचे परिपूर्ण सहकार्य राहील, असे साकडे गोवळकोट विकास समितीने नाम फाउंडेशनला घातले आहे.
गोवळकोट येथे काढलेल्या गाळाची वाहतूक करताना त्यातील चिखल रस्त्यावर सांडला. त्यातून सात ते आठ दुचाकीस्वार रस्त्यावर घसरले. ईजा झालेल्या दुचाकीस्वार व काही नागरिकांनी गाळ काढण्याचे काम बंद पाडले. ग्रामस्थांच्या या असहकार्याच्या भूमिकेमुळे नाम फाउंडेशनने गोवळकोट येथील गाळ उपसा थांबवण्याचा निर्णय घेतला. चिपळूणवासीयांच्या हितासाठी वाशिष्ठी नदीतील गाळ काढला जात आहे. हे काम थांबल्यास काही ठिकाणी गाळाने भरलेली नदी तशीच राहणार आहेत. त्याचा अनेकांना फटका बसणार आहे. या जाणिवेतून गोवळकोट विकास समितीने नाम फाउंडेशनला साकडे घालत गोवळकोट येथील गाळ काढण्याच्या कामास पुन्हा सुरवात करण्याची मागणी केली आहे.
गाळाच्या चिखलामुळे झालेला अपघात, त्यामुळे काम बंद करणे हा पर्याय नक्कीच होऊ शकत नाही, हे आम्ही जाणतो. ज्यांनी काम बंद पाडले त्या मोजक्या लोकांमुळे गाळ काढण्याचे काम बंद करण्याचा निर्णय कृपया घेऊ नये. वाशिष्ठी गाळमुक्तीचे व्रत पूर्ण करावे त्यासाठी गोवळकोट विकास समिती आणि ग्रामस्थ आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. नदीतून ओला गाळ काढला जात असल्याने रस्त्यावर चिखल होणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी रस्त्यावर पाणी मारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. एक सुपरवायझर देण्याची तयारी पालिकेने दर्शवली आहे. त्यानुसार गोवळकोट येथील कामास पुन्हा सुरवात व्हावी, अशी मागणी होत आहे. निवेदनावर समितीचे अध्यक्ष तुषार रेडीज, उपाध्यक्ष संदीप बांद्रे, महेंद्र कासेकर, दिलीप खापरे, राजेंद्र खापरे, दयानंद जुवळे, अजिम घारे, राजेंद्र सकपाळ, मंदार मिंडे, राकेश जाधव, हेमंत भैरवकर, अमोल भागडे, विनायक भैरवकर आदींनी सह्या केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com