हापूसची चव आलीय आवाक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हापूसची चव आलीय आवाक्यात
हापूसची चव आलीय आवाक्यात

हापूसची चव आलीय आवाक्यात

sakal_logo
By

.८ (टुडे पान १ साठी)


-ratchl२५३.jpg ः
२३M०४८६०
चिपळूण ः बाजारपेठेत विक्रीस आलेला हापूस आंबा.
-----
हापूसची चव आलीय आवाक्यात

दीड ते दोन हजाराला शेकडा ; हंगाम अंतिम टप्प्यात

चिपळूण, ता. २६ ः यावर्षी आंबा पीक उत्पादन घटल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत ३ ते ६ हजार रुपये शेकडा दराने आंब्याला भाव मिळाला. या आठवड्यात दीड ते दोन हजार रुपये शेकडा दराने आंबा बाजारात मिळू लागला आहे. त्यामुळे आंब्याची चव सामान्यांच्या आवाक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम हापूस आंब्यावर होतो. त्यातच अवकाळी पावसाचे मोठे संकटही उभे ठाकलेले आहे. यावर्षी हापूसच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आंबा बागायतदाराचे सुसज्ज नियोजन यातूनच टिकून राहिलेला हापूस यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस वेळेपेक्षा अगोदरच शहर बाजारपेठेत दाखल झाला. केवळ मोजक्याच व्यावसायिकांकडे असलेल्या हापूसचा दर सुरवातीच्या काळात ५ ते ६ हजार रुपये शेकडा दरात विकला जात होता. आवाक्याबाहेर असलेल्या दरामुळे हापूस खरेदीवर ग्राहकवर्गांनी पूर्णत: पाठ फिरवली होती. कालांतराने १५ ते २० दिवसांच्या कालावधीत हापूसची आवक आंबा व्यावसायिकांकडे वाढू लागल्यानंतर तो ४ ते पाच हजार शेकडा दराने विकला जात होता. असे असताना मे महिन्याच्या प्रारंभीपासून स्थानिक हापूसची आवक वाढण्यास सुरवात झाल्यानंतर काही दिवस हापूसचा दर तीन हजार शेकडा स्थिर झाला. अर्धा मे महिना संपला तरी हापूसचा दर सामान्याच्या आवाक्याबाहेरच होता.
बदलत्या वातावरणामुळे हापूसची झालेली घट तर त्या पटीत हापूसची आवक विक्रेत्यांकडे नसल्याने दर हे वाढीव राहिले. गेल्या चार ते पाच दिवसापासून ग्रामीण भागातील आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुरवातीच्या कालावधीत सहा हजार रुपये शेकडा दराने मिळणारा आंबा आता दीड ते दोन हजार रुपये दराने मिळू लागला आहे. त्यामुळे डझनापेक्षा थेट शेकड्यात खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
---------
कोट
यावर्षी हापूस आंबा उत्पादन कमी आहे. त्यातच कर्नाटकी आंब्याच्या मागणीत वाढ झाल्याने त्याचा फटका हापूस आंब्याला बसत आहे. वाढलेला दर आणि कमी झालेली मागणी याचा परिणाम हापूसच्या विक्रीवर होत आहे.
- विशाल दिवटे, आंबा व्यावसायिक, चिपळूण