-पावस मार्गावर रेलिंगसह गतिरोधकावर पांढरे पट्टे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-पावस मार्गावर रेलिंगसह गतिरोधकावर पांढरे पट्टे
-पावस मार्गावर रेलिंगसह गतिरोधकावर पांढरे पट्टे

-पावस मार्गावर रेलिंगसह गतिरोधकावर पांढरे पट्टे

sakal_logo
By

२४ (पान २ साठी)

-rat२५p४४.jpg-
२३M०४९४७
पावस ः रत्नागिरी ते पावस या सागरी मार्गावर गोळप येथील तीव्र उतारावर रेलिंग बसविण्याचे काम सुरू आहे.
--------

पावस मार्गावर रेलिंगसह पांढरे पट्टे

पावस, ता. २५ ः वायंगणी-पावसमार्गे गावखडी या सागरी मार्गावर उतारावर संरक्षक कठडे अथवा रेलिंग टाकण्यात यावे. तसेच रस्त्यावर गतिरोधकावर पांढरे पट्टे मारावेत, अशा मागणीचे निवेदन पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. या निवेदनानुसार बांधकाम विभागाने पांढरे पट्टे मारण्यास सुरवात केली आहे.
रत्नागिरी पावसमार्गे राजापूर या सागरी मार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत चालल्यामुळे तीव्र उतार व अन्य ठिकाणी अपघाताची संख्या वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून तीव्र उतार असलेल्या ठिकाणी रेलिंग अथवा संरक्षण भिंत बांधण्यात यावी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने संभाव्य धोका लक्षात घेऊन या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पांढरे पट्टे आणि गतिरोधकांच्या ठिकाणी पांढरे पट्टे मारले आहेत. तीव्र उताराच्या ठिकाणी रेलिंग उभारली जात आहेत.