''स्वर हर्ष'' संगीत मैफलीने तळेरेत रसिक मंत्रमुग्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''स्वर हर्ष'' संगीत मैफलीने तळेरेत रसिक मंत्रमुग्ध
''स्वर हर्ष'' संगीत मैफलीने तळेरेत रसिक मंत्रमुग्ध

''स्वर हर्ष'' संगीत मैफलीने तळेरेत रसिक मंत्रमुग्ध

sakal_logo
By

swt2521.jpg
04949
तळेरेः येथे ‘स्वर हर्ष’ कार्यक्रमात शास्त्रीय युवा गायक हर्ष नकाशे यांनी गायनाने मैफिल सजवली. (छायाचित्र : एन. पावसकर)

‘स्वर हर्ष’ संगीत मैफलीने
तळेरेत रसिक मंत्रमुग्ध
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ : येथील मधुकट्ट्यावर युवा शास्त्रीय गायक हर्ष नकाशे यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले. संवाद परिवाराने आयोजित केलेल्या या मैफिलीला पंचक्रोशीतील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हर्ष यांनी शास्त्रीय गायन, अभंग, नाट्यगीत, गझल असे चौफेर सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध केले.
येथील संवाद परिवाराच्यावतीने दर महिन्याला साहित्य, सामाजिक, कला विषयक एक उपक्रम आयोजित केला जातो. या महिन्यासाठी नाधवडे येथील युवा शास्त्रीय गायक हर्ष नकाशे यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले. मैफिलीचा प्रारंभ नकाशे यांनी कलावती या रागाने केला. या रागाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यानंतर विविध अभंग, नाट्यगीत, गझल सादर आदी प्रकार सादरकेले. दुभंगल्या माझ्या जीवा जोडीतो अभंग, युवती मना, बिती विभावरी जागरी, तुम मुझे अपने क्षितिज से, गुंतता हृदय हे, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, माझे चित्त तुझे पायी, ध्यान लागले रामाचे अशा अनेक उत्तम रचना सादर केल्या. यावेळी गायक नकाशे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या मैफिलीचे सूत्रसंचालन श्याम सावंत यांनी केले.