15 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के

15 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के

३० (पान २ साठी)

चिपळूणचा निकाल १०० टक्के

१५ महाविद्यालयांचा समावेश; ३ हजार १६१ विद्यार्थी उत्तीर्ण

चिपळूण, ता. २५ ः तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९४.०२ टक्के लागला आहे. तालुक्यातून ३ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ३६२ विद्यार्थी परीक्षेला बसले असता ३ हजार १६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच १३३ पैकी १३२ रिपिटर्स उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील एकूण ३२ महाविद्यालयांपैकी तब्बल १५ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
महाविद्यालयांचा निकाल असा ः डीबीजे महाविद्यालय ८५.६८ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज सावर्डे ९८.३४ टक्के, शिरगाव ज्युनि. कॉलेज ९८.६४ टक्के, रामपूर मिलिंद ज्युनि. कॉलेज १०० टक्के, कमलाबाई वामन पेठे ज्युनि. कॉलेज मार्गताम्हाणे ९४.११ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि. कॉलेज अलोरे ९७.५६ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज वहाळ ९४.०२ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनि. कॉलेज खेर्डी ९८.२५ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज भोम १०० टक्के, फातिमा दलवाई ज्युनि. कॉलेज कालुस्ते ९६.७३ टक्के, महाराष्ट्र हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनि. कॉलेज आर्टस् ८१.६९ टक्के, एस. पी. एम. इंग्लिश मीडियम ज्युनि. कॉलेज (वाणिज्य) १०० टक्के, माता रमाई आंबेडकर ज्युनि. कॉलेज कळंबस्ते १०० टक्के, डॉ. संभाजीराव चोरगे ज्युनि. विज्ञान कॉलेज मांडकी-पालवण ९४.७० टक्के, श्री रामवरदायिनी विद्यालय निरबाडे १०० टक्के, मोहन विद्यालय आकले १०० टक्के, वसंतराव देसाई माध्यमिक विद्यालय असुर्डे आंबतखोल ९५.७१ टक्के, बाळासाहेब माटे कनिष्ठ महाविद्यालय कामथे ९५.१२ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज पाचाड १०० टक्के, वसंत जयराम भागवत विद्यामंदिर अ‍ॅण्ड ज्युनि. कॉलेज बोरगाव १०० टक्के, सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल १०० टक्के, पेढे परशुराम येथील आर. सी. काळे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय १०० टक्के, नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनि. कॉलेज मिरजोळी १०० टक्के, नूतन विद्यालय डुगवे १०० टक्के, रिगल कॉलेज कोंढे ८७.५० टक्के, आनंदराव पवार ज्युनि. कॉलेज ९२.३० टक्के, सौ. शैलजा शिंदे आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड ज्युनि. कॉलेज ८५.७१ टक्के, नायशी कला व वाणिज्य ज्युनि. कॉलेज १०० टक्के, आयटीआय सावर्डे १०० टक्के, शासकीय आयटीआय चिपळूण ८८.८८ टक्के, सावर्डे ज्युनि. कॉलेज पुनर्परीक्षार्थी ९८.८६ टक्के, शिरगाव हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनि. कॉलेज १०० टक्के निकाल लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com