मुणगे बांदेकर कॉलेजचा बारावीचा 100 टक्के निकाल

मुणगे बांदेकर कॉलेजचा बारावीचा 100 टक्के निकाल

swt२५२३.jpg
०४९६०
ईशा हिर्लेकर, सायली परब, दीपेश लब्दे

मुणगे बांदेकर कॉलेजचा
बारावीचा १०० टक्के निकाल
मुणगे, ता. २५ः येथील श्री भगवती एज्युकेशन सोसायटी संचलित श्री भगवती हायस्कूल आणि वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होके. कोर्सेसचा बारावीचा निकाल प्रतिवर्षीप्रमाणे शंभर टक्के लागला.
ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी आणि अकाउंटिंग या दोन विभागांतून अनुक्रमे ईशा हिर्लेकर (८१.३३), सायली परब (७५.१७), दीपेश लब्दे (७४.३३) यांनी प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले. एकूण ३७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी दोन विद्यार्थी विशेष योग्यता, २४ प्रथम श्रेणीत तर ११ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष न. ना. पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष नीलेश परुळेकर, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, व्यवस्थापक देवदत्त पुजारे यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com