भाजप कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा
भाजप कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा

भाजप कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा

sakal_logo
By

१३ (पान ५ साठी)

- ratchl२५६.jpg ः
२३M०४९६९
चिपळूण ः कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉ. विनय नातू.
---
कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा

डॉ. विनय नातू ; भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक

चिपळूण, ता. २५ ः आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन बांधणीवर भर देतानाच निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी आतापासूनच जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले.
चिपळुणात भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. डॉ. नातू यांनी सध्याच्या स्थानिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करत पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे यांनी वरिष्ठांनी केलेल्या सूचनांसदर्भात उपस्थित पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी रायगड लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, सोपान जांभेकर, जिल्हा संघटन सरचिटणीस नागेश धाडवे, जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, प्रदेश निमंत्रित सदस्या रश्‍मीताई पालशेतकर, तालुकाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य नीलेश सुर्वे, खेड दक्षिण तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे, दापोली तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, माजी नगरसेवक व चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू, माजी नगराध्यक्षा व जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप आदींसह जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन युवामोर्चा तालुका सरचिटणीस मंदार कदम यांनी केले.