खेड-खेडमध्ये संतप्त प्रवाशांनी अडवल्या बसफेऱ्या

खेड-खेडमध्ये संतप्त प्रवाशांनी अडवल्या बसफेऱ्या

फोटो ओळी
-rat२५p५२.jpg ःKOP२३M०४९६५ खेड ः खेड बसस्थानकात आलेल्या रत्नागिरी-दापोली बसमध्ये चढण्यासाठी कसरत करताना वाहक आणि प्रवाशांचा वाद सुरू होता.
-rat२५p५३.jpg ः KOP२३M०४९६६ मुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरी दौऱ्यामुळे एसटीच्या बिघडलेल्या नियोजनामुळे वाहतूक नियंत्रण कक्षासमोर झालेली गर्दी.

खेडमध्ये संतप्त प्रवाशांनी अडवल्या बसेस
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचा फटका; ग्रामीण भागातील दहा बसफेऱ्या अचानक रद्द
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ ः मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी खेड आगारातील एसटी बसेस बुकिंग असल्यामुळे खेड आगारातून ग्रामीण भागात जाणाऱ्या दहा बसफेऱ्या अचानक रद्द केल्याने काल बुधवारी (ता. २४) मे रोजी संध्याकाळी ग्रामीण भागात जाणाऱ्या व दुर्गम ठिकाणी जाणाऱ्या वस्तीच्या बसेसदेखील रद्द झाल्याने प्रवासी संतप्त झाले. संतप्त प्रवाशांनी खेड बसस्थानकातील लांब पल्ल्याच्या गाड्या अडवून आंदोलन केले.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी खेडमधून रत्नागिरीला जाण्यासाठी तब्बल ४० एसटी बसेस बुकिंग केल्यामुळे ग्रामीण भागातल्या बसफेऱ्यांचे संपूर्ण नियोजन ढासळले होते. विद्यार्थी तसेच ग्रामीण भागात दुर्गम डोंगराळ भागात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अचानक गाड्या रद्द केल्यामुळे कोकणातील दुर्गम व डोंगराळ भागात वस्तीच्या गाड्या रद्द केल्यामुळे प्रवासी संतप्त झाले. ग्रामीण भागातील बसफेऱ्या रद्द झाल्याने संतप्त प्रवाशांनी खेड बसस्थानकात सर्वच गाड्या अडवून ठेवल्या. पोलिसांच्या मदतीने सुमारे अर्धा तास अडवून ठेवलेल्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या सोडण्यात आल्या तर आज सकाळपासून खेड बसस्थानकात प्रवासी आणि वाहतूक निरीक्षक यांच्यात भांडणे सुरू आहेत.
आज रत्नागिरी येथे होणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या शासन आपल्या दारी या दौऱ्यावेळी प्रत्येक तालुक्यातून शेतकऱ्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी एसटी बसेसचे बुकिंग केले गेले आहे; मात्र हे बुकिंग करताना स्थानिक ग्रामीण भागातल्या बसफेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवासी संतप्त झाले. काही लांब पल्ल्याच्या जादा गाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बसस्थानकात एका फलकावर रद्द झालेल्या बसेसची यादी लिहून ठेवली होती; मात्र ग्रामीण भागात जाणारा दररोजचा कामगार वर्ग तसेच विद्यार्थी यांना याची कल्पना नसल्याने नेहमीप्रमाणे ते बसस्थानकात आले असता ग्रामीण भागातील बसफेऱ्या रद्द असल्याचे त्यांना कळाले. वाहतूक नियंत्रकांशी प्रवाशांची भांडणे सुरू आहेत.

कोट
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी गर्दी जमवायची होती तर खासगी गाड्या घेऊन जाणे आवश्यक होते. उन्हाळी सुट्टीच्या दिवसात अशाप्रकारे कार्यक्रमाचे नियोजन करून एसटीच्या गाड्या त्या कार्यक्रमस्थळी घेऊन जाणे, हे कितपत योग्य आहे? आज बसफेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. याची परतफेड जनता निश्चितच करेल.
- सुरेश मोरे, प्रवासी, कुंभाड, खेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com