आरोग्यवर्धिनी उपकेंद्र आंबडवे ठरली कायाकल्प प्रथम पुरस्कार विजेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र आंबडवे ठरली कायाकल्प प्रथम पुरस्कार विजेती
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र आंबडवे ठरली कायाकल्प प्रथम पुरस्कार विजेती

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र आंबडवे ठरली कायाकल्प प्रथम पुरस्कार विजेती

sakal_logo
By

३४ (पान ५ साठी)


-rat२५p५४.jpg ः
२३M०४९६७
रत्नागिरी ः पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना आंबडवे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र.
----
आंबडवे उपकेंद्राला कायाकल्प पुरस्कार

मंडणगड, ता. २५ ः जिल्हास्तर कायाकल्प प्रथम पुरस्कार आरोग्यवर्धिनी उपकेंद्र आंबडवे (ता. मंडणगड) यांना प्राप्त झाला आहे. या वेळी उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत व मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांच्या हस्ते उपकेंद्रांचे समुदाय अधिकारी डॉ. आसिफ खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रथम क्रमांकाचे कायाकल्प पुरस्कार व एक लाख बक्षीस देऊन आंबडवेच्या उपकेंद्राचे अभिनंदन करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना शासनाकडून मिळणारा कायाकल्प पुरस्कार तसेच आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यिका यांना फलोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार त्याचबरोबर उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसेविकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेत पुरस्काराचे वितरण झाले. यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रथम पारितोषिक मिळवलेल्या आशा स्वयंसेविका वेदिका शेडगे, ईश्वरी जाधव, निधी भाटकर तसेच तालुकास्तरावर प्रथम पारितोषिक प्राप्त आशा स्वयंसेविका सेजल लोखंडे यांना देखील या वेळी गौरवण्यात आले.