पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

पान 3साठी
अपघातप्रकरणी मोटारचालकावर गुन्हा
रत्नागिरी ः शहराजवळील पानवल थांब्यावर मोटारीने दुचाकीला धडक दिली. अपघातात स्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सिद्धेश निळकंठ निमकर (रा. बहादूरशेख नाका, चिपळूण) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. 24) दुपारी साडेतीनच्या सुमारास पानवल थांबा येथे घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा मित्र शुभम सुनील पालये याच्यासोबत दुचाकी वरून मिरजोळे एमआयडीसी ते कापडगाव जाताना मोटारीची चालक संशयित निमकर याने भरधाव गाडी चालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये शुभम यांचा मृत्यू झाला तर फिर्यादी गंभीर जखमी झाला. या प्रकरणी फिर्यादी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.


गोळपसडा येथून दुचाकीची चोरी
पावस ः गोळप सडा येथील रेडस्टोन अपार्टमेंट येथे पार्क केलेली दुचाकी चोरट्याने पळवली. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (ता. 13) ते 16 मे सकाळी 10 या कालावधीत घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी दुचाकी (एमएच 08 एए 4662) ही रेडस्टोन अपार्टमेन्ट नाखवा कॉम्प्लेक्स गोळप सडा येथील इमारतीच्या खाली पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती पळवली. या प्रकरणी फिर्यादी यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पूर्णगड पोलिस अंमलदार करत आहेत.

दारूविक्रीप्रकरणी संशयितावर गुन्हा
रत्नागिरी ः शहराजवळील मिरजोळे येथे एका कंपनीसमोर रस्त्यावर प्लास्टिक कागद मारून तयार केलेल्या झोपडीत हातभट्टीची दारू विकणाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अजित रघुनाथ शिंदे असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २३) रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस पेट्रोलिंग करत असताना संशयिताकडे अवैध गावठी हातभट्टीची दारू विक्री व स्वतःकडे बाळगल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.


मिऱ्याबंदर येथील तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी ः बेशुद्धावस्थेत आढळलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. महेंद्र सदानंद माचिवले (वय 30, रा. मिऱ्याबंदर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. 24) सकाळी सव्वादहाच्या सुमारास रेमंड रेस्टहाऊस भोळेवाडी, पांढरा समुद्र येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र दोन दोन दिवस घरी येत नसे. त्याची मुलगी घरी घरकाम करत असताना तिला फोन आला की, महेंद्र पडलेला आहे. त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेंद्र यास तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.