ः42 निराधार, दिव्यांगांना नारकर दाम्पत्याचा आधार

ः42 निराधार, दिव्यांगांना नारकर दाम्पत्याचा आधार

१६ (पान ३ साठी, अॅंकर)

-ratchl२५२.jpg ः
२३M०४८७५
दिव्यांगांची काळजी घेणारे कर्मचारी.
------------

निराधार, दिव्यांगांना नारकर दाम्पत्याचा आधार

आरती निराधार सेवा फाउंडेशन ; पेढे,चिपळुणात सेवाकार्य

नागेश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः समाजातील अनेक निराधार व्यक्तींना उतारवयात हक्काचा निवारा मिळत नाही. कुटुंबात एखादी व्यक्ती दिव्यांग असल्यास त्यांना नियमितपणे वैद्यकीय उपचार मिळण्यास अडचणी येतात. अशा निराधार आणि दिव्यांगांसाठी पेढे येथील आरती निराधार सेवा फाउंडेशन आधारवड बनली आहे. नारकर पती-पत्नींनी सेवानिवृत्तीनंतर आयुष्याची पुंजी या सेवाकार्यासाठी सार्थकी लावली आहे.
अनिता आत्माराम नारकर (वय ६८) व आत्माराम गोपाळ नारकर (७०) मुंबई महानगर पालिकेतून सेवानिवृत्त झालेले कुटुंब. एक मुलगा आणि मुलगी असा त्यांचा परिवार. मुलगी दिव्यांग असल्याने येणाऱ्या समस्या त्यांनी मुलीच्या बालपणापासूनच अनुभवल्या होत्या. दिव्यांगांसाठी शाळांची सुविधा आहे; मात्र त्यांच्यासाठी निवासी सुविधा नाही. अनेक निराधार व्यक्तींनांही निवासी सुविधा मिळत नाही. अशा लोकांचे जगणे सुसह्य व्हावे, त्यांना नियमितपणे वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी सेवानिवृत्तीनंतर नारकर कुटुंबीयांनी २१ जानेवारी २०१८ ला ''आरती निराधार सेवा फाउंडेशनची'' स्थापना केली. यासाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा अनिता नारकर यांनी २ वर्षाचा स्पेशल डीएसडचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या आर्थिंक पुंजीतून पेढे येथे बंगला विकत घेतला. तेथे सुरवातीला दिव्यांगांच्या निवासाची सोय केली. संस्थेला अनुदान नसल्याने दिव्यांगांचे कुटुंबीय जेवढी फी देतील त्यातून वाटचाल सुरू ठेवली. २ वर्षानंतर वयोवृद्धांना निवासाची सुविधा देण्यात आली. ज्यांना मुले नाहीत, एकटेच राहतात, अशा लोकांची निःशुल्क निवासी सुविधा दिली. सध्याच्या स्थितीला दिव्यांग, वृद्ध, निराधार असे ४२ लोक येथे वास्तव्याला आहेत. त्यांच्या व्यवस्थेसाठी १२ कर्मचारी दिमतीला आहेत. सकाळी चहा, नाष्टा आणि जेवण दिले जाते. येथील दिव्यांग तसेच निराधार व्यक्तींना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी डॉ. ऋतिका कोतकुंडे आणि डॉ. अन्वर जबले व डॉ. रेहाना जबले हे मोफत सेवा देतात.
----
कोट
सामाजिक जाणिवेतून सुरू असलेल्या या कामासाठी शासकीय अनुदान मिळावे यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय; मात्र त्याला अद्याप यश मिळालेले नाही. ४२ लोकांच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. दानशूर तसेच औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनी या कामी सहकार्य केल्यास या सेवाभावी कार्याला आणखी बळ मिळेल.

- अनिता नारकर, संस्थापिका, आरती निराधार सेवा फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com