शिवशाहीमधील प्रवाशाचे दागिने आणि रोकड लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवशाहीमधील प्रवाशाचे दागिने आणि रोकड लंपास
शिवशाहीमधील प्रवाशाचे दागिने आणि रोकड लंपास

शिवशाहीमधील प्रवाशाचे दागिने आणि रोकड लंपास

sakal_logo
By

४८ (पान ३ साठी)

एसटीतून प्रवाशाच्या दागिने रोकड डल्ला

दाभोळ, ता. २५ : बोरीवली-दापोली शिवशाही बसमधून प्रवाशाच्या बॅगमधून १ लाख ४० हजाराचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपा तांबे व त्यांचे पती १२ मे रोजी सकाळी ६ च्या बोरीवली दापोली बसने येत होते. त्यांच्यासोबत ३ बॅगा होत्या, त्या त्यांनी सीटवर असलेला रॅकवर ठेवल्या होत्या. दुपारी बस दापोली येथे आली असता त्या बॅगा घेवून खाली उतरल्या असता एका बॅगची चेन उघडी असल्याचे त्यांना दिसली. त्यांनी बस स्थानकात जावून ती बॅग उघडून पहिली त्यातील कपड्याच्या आत ठेवलेल्या एका डब्यातील दागिने व रोख रक्कम त्यांना दिसली नाही. १ लाख १८ हजाराचे सोन्याचे दागिने व रोख रुपये २२ हजार असे त्या डब्यात ठेवले होते ते चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आगार व्यवस्थापकांकडे तक्रार केली. त्यांना या बसमधील कॅमेरे बंद असल्याने तक्रार घेता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.