एसआयआयएलसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसआयआयएलसी
एसआयआयएलसी

एसआयआयएलसी

sakal_logo
By

किचन गार्डनविषयी उद्या
कोल्हापुरात कार्यशाळा
उदयमनगरमधील सकाळ कार्यालयात आयोजन

कोल्हापूर, ता. २५ : आजकाल सर्वजण आहाराच्या बाबतीत चौकस असल्याने दररोजच्या खाण्यात ताजा आणि विषमुक्त भाजीपाला हवासा वाटतो. या पद्धतीने असा भाजीपाला आपण कसा पिकवू शकतो व शोभेची इतर झाडेही घरच्या घरी तयार करू शकतो. काय आहे ही पद्धत व संकल्पना? याबाबत मार्गदर्शन करणारी एक दिवसीय कार्यशाळा शनिवारी (ता.२७) सकाळ ऍग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे कोल्हापूर येथील सकाळ कार्यालयात आयोजिली आहे.

टेरेस गार्डन, बाल्कनी गार्डन, इनडोअर भाजीपाला गार्डन, आउटडोअर भाजीपाला गार्डन, जनरल किचन गार्डन आदी प्रकारांविषयी यामध्ये मार्गदर्शन केले जाईल. टेरेस वा घराजवळील जागेत भाजीपाल्याशिवाय हंगामी कोणकोणती फुलझाडे व शोभेची झाडे आपण लागवड करू शकतो, त्यासाठीचे नियोजन, माती व कुंड्या भरण्याची पद्धती तसेच अन्नद्रव्य आणि रोग-कीड नियंत्रण, हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, एक्वापोनिक्स आदींविषयीसुद्धा मार्गदर्शन होणार आहे.

चौकट

कार्यशाळेतील विषय
- किचन गार्डनचे प्रकार, त्यासाठीचे नियोजन व पूर्वतयारी
- मानवी आहारासाठी आवश्यक भाजीपाला व लागवड
- शोभेची झाडे व त्याचे प्रकार
- माती व सेंद्रिय खतांचे नियोजन
- कुंड्या, वाफे भरण्याची शास्त्रोक्त पद्धती
- भाजीपाल्याची शास्त्रोक्त लागवड
- सेंद्रिय पद्धतीने कीड-रोगांचे नियंत्रण

नोंदणी...
प्रतिव्यक्ती शुल्क १५०० रूपये
कार्यशाळेचे ठिकाणः सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिरजवळ, कोल्हापूर
नोंदणीसाठी संपर्क : ९१७५७२४३९९