रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा

१० (टुडे पान १ साठी)

पोलिस अधीक्षकांची चौकशी करा

ठाकरे गटाची पोलिस महासंचालकांकडे मागणी ; बारसूत राजकीय दबावापोटी अत्याचार

रत्नागिरी, ता. २६ ः जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील राजकीय आंदोलकांवर दबावापोटी अत्याचार सुरू आहेत. या प्रकरणी रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत यांच्यासह बारसू ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. २५) पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेतली. रिफायनरीला विरोध करणाऱ्या बारसूतील ग्रामस्थांवर पोलिसांकडून अमानुष अत्याचार सुरू असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी आदेश दिल्यामुळे आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण झाली. पोलिस हे फक्त राजकीय दबावापोटी करत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी एका मुलीने आपली तक्रार मांडली असता तिला पोलिस अधीक्षकांनी बोलावून धमकी दिल्याचा प्रकारही आहे. या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी पोलिस महासंचालकांकडे केली. पोलिस अधीक्षकांसह इतर पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने पोलिस महासंचालकांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com