मंडणगड-22 कोटींचा खर्च, तरीही आंबेत पूल बंदच

मंडणगड-22 कोटींचा खर्च, तरीही आंबेत पूल बंदच

२ (टुडे पान १ साठीमेन)


-rat२६p२.jpg-
२३M०५०८४
म्हाप्रळ ः तीन वर्षांपासून दुरुस्ती होत असलेला आंबेत पूल.
----

२२ कोटींचा खर्च, तरीही आंबेत पूल बंदच

विकासाच्या नुसत्याच गप्पा; ३ वर्षे सुरू आहे दुरुस्ती
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २६ ः तब्बल १२ कोटी रुपये खर्च करून आंबेत पूल अवघ्या आठच महिन्यात पुन्हा दुरुस्तीस आल्याने पुन्हा दुरुस्तीसाठी दहा कोटी रुपये मंजूर करावे लागले. तरीसुद्धा गेल्या ३ वर्षात पुलाची दुरुस्ती काही पूर्ण होईना म्हणून फेरीबोटीतून एसटी बसची वाहतूक करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. त्यामुळे कोकण विकासाच्या जाहिरातींवर सरकारी तिजोरीतून उधळपट्टी करून कोकण विकासाच्या गप्पांचा केवळ आभास निर्माण करणाऱ्या सरकारचे आंबेत पूल हे खरे अपयश आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालूक्यातील म्हाप्रळ आणि रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील आंबेत या दोन गावांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील आंबेत पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे आंबेत पुलावरून वाहतूक थांबली. या खाडीत दळणवळणासाठी फेरीबोट ठेवण्यात आली आहे. सुरवातीला वाहनासाठी भाडे आकारले जायचे. त्यानंतर मोफत सेवा देण्याचे ठरले. गेल्या पाच दिवसापासून या फेरीबोटीतून एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? एसटी महामंडळ, फेरीबोट चालक, मेरीटाईम बोर्ड, जबाबदारी कोणाची? हा प्रश्न अनुत्तरीय आहे. फेरीबोटीतून प्रवास करणाऱ्यांना लाईफजॅकेट व जीवरक्षकांची नसलेली नेमणूक यामुळे फेरीबोटीतून एसटी बसची वाहतूक ही धोक्याचीच आहे. रत्नागिरी-रायगड जिल्ह्यात जयगड तवसाळ, वेसवी बागमांडले, दाभोळ धोपावे, फरारे परचुरी, दिघी आगरदांडा अशा फेरीबोटी सुरू आहेत; मात्र त्या ठिकाणच्या फेरीबोटीतून एसटी बस नेण्यास परवानगी नाही. अपवाद फक्त म्हाप्रळ-आंबेत फेरीबोटीचा आहे. म्हाप्रळ-आंबेत फेरीबोटीतून मंडणगड आगारातील साध्या प्रकारातील १३ एसटी बसेस फेरीबोटीतून नेण्यात येतात. त्यातील ६ बस या फक्त जाताना नेण्यात येतात, तर दापोली आगारातून १ शयनयान आसनी, १ निमआराम आणि ६ साध्या प्रकारच्या अशा एकूण ८ एसटी बस नेण्यात येत आहेत. जेव्हा एखाद्या मार्गावर एसटी बससेवा सुरू केली जाते तेव्हा त्या मार्गाची पाहणी केली जाते. त्यानंतर संबंधित यंत्रणेकडून दाखला दिल्यानंतरच एसटी सेवा सुरू करण्यात येते. असे असताना नेमकी या मार्गाची पाहणी कोणी केली? दाखला कोणी दिला? तेव्हा फेरीबोटीतून एसटी सेवा सुरू करण्यात आली की अधिकाऱ्यांवर कोणाचा राजकीय दबाव होता हे जबाबदारी टाळण्याआधीच तपासणे गरजेचे आहे.
-------
कोट
दुरुस्तीवर कोटींचा खर्च करूनही आंबेत पूल अद्यापही वाहतुकीला सुरू करण्यात शासन, प्रशासनाला अपयश आले आहे. कोकण विकासाच्या वल्गना करणाऱ्या सरकारने कोकणातील मंडणगड, दापोली या अतिशय महत्वपूर्ण तालुक्याना विकासात्मक प्रवाहात दुर्लक्षित ठेवले आहे. याला या मतदार संघातील सर्वच लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत.
- रघुनाथ पोस्टुरे, समाजसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com