तीन रेल्वे डिझेल इंजिनवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन रेल्वे डिझेल इंजिनवर
तीन रेल्वे डिझेल इंजिनवर

तीन रेल्वे डिझेल इंजिनवर

sakal_logo
By

९ (टुडे पान १ साठी, संक्षिप्त)

तीन गाड्या डिझेल इंजिन जोडून धावणार

रत्नागिरी ः कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या मांडवी, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस तसेच सावंतवाडी-मडगाव-सावंतवाडी या सध्या विद्युत इंजिन जोडून धावत असलेल्या तीन गाड्या पुन्हा एकदा डिझेल इंजिनवर चालवण्याची वेळ रेल्वेवर आली आहे. याची अंमलबजावणी २७ मे २०२३ पासून या गाड्यांच्या डाऊन दिशेच्या फेऱ्यांपासून केली जाणार आहे. विद्युत इंजिन पुरेसे नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा सुरू आहे. या आधीपासूनच इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर चालवल्या जाणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव मांडवी एक्स्प्रेस तसेच दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, सावंतवाडी-मडगाव-सावंतवाडी या तीन गाड्या २७ मे रोजीच्या फेरीपासून इलेक्ट्रिकऐवजी डिझेल लोको जोडून चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. इलेक्ट्रिक लोको कमी असल्यामुळे रेल्वेकडून हा पर्याय अवलंबला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या या दोन एक्स्प्रेस गाड्या आता पुन्हा एकदा डिझेल इंजिनसह धावणार आहेत. रेल्वेने हा निर्णय पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात घेतला आहे.
---
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना पत्र

चिपळूण ः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्र लिहून रेल्वे तिकीट बुकिंग व्यवस्थेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. गणेशोत्सवाचे सर्व आरक्षण फुल्ल झाले आहे. गणेशोत्सव काळात ज्याला आरक्षण हवे असेल तर त्यांनी काय करायचे, असा प्रश्न मुकादम यांनी विचारला आहे. आरक्षित केलेले सर्व तिकीट रद्द करून पुन्हा नव्याने प्रवाशांना संधी द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. खासदार विनायक राऊत यांच्याकडेही त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. कोकण रेल्वेने गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीचे म्हणजे १७ सप्टेंबरपर्यंतचे रेल्वेचे आरक्षण १९ मे २०२३ला अवघ्या काही मिनिटांतच फुल्ल झाले. त्यामुळे गणेशोत्सव काळात धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये आता एकही आरक्षित तिकीट शिल्लक उरलेले नाही. त्यामुळे या आरक्षित तिकिटांवर नेमके डल्ला कोण मारत आहे, याची चौकशी करण्याची मागणी शौकत मुकादम यांनी रेल्वे मंत्र्याकंडे केली आहे.
--
बोंड्ये गावातील रस्त्याचे उदघाटन

पावस ः संगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये गावात आमदार शेखर निकम यांनी आपल्या विकास फंडातून उपलब्ध करून दिलेल्या निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचे उद्‍घाटन झाले. याप्रसंगी यापुढेही बोंड्ये गावातील विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आमदार निकम यांनी सांगितले. या वेळी प्रफुल्ल भुवड, मंगेश बांडागळे, नितीन भोसले, हुसेन बोबडे, अनंत जाधव, ललीता गुढेकर आदी उपस्थित होते.