...तर देवगडचा पाणीपुरवठा केव्हाही ठप्प? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर देवगडचा पाणीपुरवठा केव्हाही ठप्प?
...तर देवगडचा पाणीपुरवठा केव्हाही ठप्प?

...तर देवगडचा पाणीपुरवठा केव्हाही ठप्प?

sakal_logo
By

...तर देवगडचा पाणीपुरवठा केव्हाही ठप्प?

नगरपंचायतीची माहिती; नादुरूस्त पंपामुळे अडचणीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २६ ः येथील देवगड जामसंडे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिबांव येथील पुरक नळयोजनेचा मुख्य पंप नादुरूस्त झाल्याने पर्यायी पंपाची पाणी खेचण्याची क्षमता कमी आहे. नादुरूस्त पंप अद्याप जागेवरच आहे. पर्यायी पंप देखील नादुरूस्त झाल्यास शहराचा पाणी पुरवठा केव्हाही ठप्प होऊ शकतो, अशी माहिती प्रशासनातर्फे येथील देवगड-जामसंडे नगरपंचायत सभेत देण्यात आली. त्यामुळे नादुरूस्त पंप तातडीने दुरूस्त करण्याच्या हालचाली होण्याची अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त करून त्यासाठी प्रसंगी योगदान देण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, शहराला अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने बील आकारणीबाबत विचार व्हावा, अशीही मागणी करण्यात आली.
येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मंचावर उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेवक संतोष तारी, तेजस मामघाडी, विशाल मांजरेकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे आदी उपस्थित होते. सध्या शहराला अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचा विषय विरोधी नगरसेवकांनी काढताच प्रशासनाने त्याबाबतची माहिती दिली. त्यानुसार हल्लीच दुरूस्त करून आणलेला पंप पुन्हा लगेचच नादुरूस्त झाला आहे. पर्यायी लावलेल्या पंपाची पाणी खेचण्याची क्षमता कमी आहे. नादुरूस्त पंप अजून दहिबांवमध्येच आहे. त्यामुळे आताचा पंप बंद पडल्यास पाणी पुरवठा किमान पंधरा दिवस बंद राहू शकतो, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे बंद पडलेल्या पंपाची तातडीने दुरूस्ती करण्यावर सर्व नगरसेवकांचे एकमत होऊन यासाठी प्रसंगी योगदान देण्याची तयारी दर्शवली. तर हाच धागा पकडून नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी अनियमित पाणी पुरवठा होत असल्यास ग्राहकांना बीले आकारू नयेत, अशी मागणी केली. मात्र, तसेच करता येणार नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट करताच मग चार महिन्याचे एकच बील काढण्याचे नगरसेवकाकडून सुचवण्यात आले. शहरातील रस्ते करण्यावरून मतदान घेतले गेले. रस्ते हॉटमिक्स करण्यावर सत्ताधारी ठाम होते तर अरूंद भागात कोल्डमिक्स रस्ता करण्याची विरोधी नगरसेविका प्रणाली माने यांची मागणी होती. यावर सत्ताधारी नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी अरूंद भागात यंत्र जाणार नाही. तेथे यंत्राची अट शिथिल करावी. मात्र, साहित्य हॉटमिक्सच वापरावे, असा आग्रह धरला. यामुळे रस्ते अधिक काळ टिकतील, असेही त्यांचे म्हणणे होते; मात्र, बराच काथ्याकुट होऊनही चर्चा वाढत राहिल्याने त्यावर मतदान घेतले गेले. जामसंडे येथील नुतन इमारतीमुळे नैसर्गिक ओहोळाचे पात्र अरूंद झाल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून मुख्य मार्ग बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. याबाबतची पाहणी प्रशासनाने करण्याचे सुचवण्यात आले.
...................
चौकट
‘गुड मॉर्निंग’ पथक
समुद्रकिनारी भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे स्वागत नगरपंचायतीच्या ‘गुड मॉर्निंग’ पथकाने करावी, असे यावेळी ठरवण्यात आले.
.......................
सभेतील मागण्या
* पवनचक्की उद्यानाजवळ व्यवसायासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे
* शहरातील वॉटर एटीएम लवकर सुरू करावे
* पावसापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करावी
* डासांचे वाढते प्रमाण लक्षात घेता शहरात फॉगींग करावे
* सर्वसाधारण सभेला अभियंता आणि अकौंटंट उपस्थित रहावेत