-जाहिरात लेख

-जाहिरात लेख

२३ (टुडे पान २ साठी, तळात घ्यावा.)


rat२६p२१.jpg-
२३M०५१५८
रत्नागिरी ः भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यामध्ये खचाखच भरलेल्या सभागृहात भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन.
--------
निष्कलंक चारित्र्याचा कुशल संघटक अॅड. दीपक पटवर्धन

दक्षिण रत्नागिरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून दमदार कामगिरी केली आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांचे संघटन कौशल्य, नेतृत्व आणि कर्तृत्व झळाळले असून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने यश मिळवले. थेट सरपंचही निवडून आले. राज्यात सरकार नसताना जिल्हा चालवणे आव्हानात्मक होते. आता भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला अधिक सक्रिय करण्यात अॅड. पटवर्धन यांचा महत्वाचा वाटा आहे. २०२४च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची विजयी घोडदौड करण्याकरिता अॅड. पटवर्धन कार्यकर्त्यांसमवेत सज्ज आहेत.
----

कॉलेज जीवनापासून भारतीय जनता युवा मोर्चा, भाजपामध्ये सक्रिय असलेल्या अॅड. दीपक मनोहर पटवर्धन यांना २०१९ मध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्षपद मिळाले. यानंतर लगेचच तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मंत्र्याची महाजनादेश यात्रा कोकणात आली. मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झालेल्या या विराट यात्रेचे नेटके नियोजन अॅड. पटवर्धन यांनी केले. अॅड. पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून जनसेवेचे व्रत जपले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री आमदार रवी चव्हाण, भाजपाचे आमदार यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू ठेवले.
जनादेशाप्रमाणे गेल्या वर्षी भाजपा-शिवसेना सरकार स्थापन झाले. संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी अॅड. पटवर्धन यांना बळ मिळाले. दक्षिण रत्नागिरी भाजपने गेल्या वर्षभरात अनेकविध उपक्रम जनतेत मिसळून पार पाडले. संघटनेतील सर्वांना बरोबर घेऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याकरिता अॅड. पटवर्धन हे झंझावाती दौरे करत आहेत. जिल्हा कार्यकारिणीचे गठन, पाचही मंडलातील कार्यकारिणी गठन, विविध मोर्चा, आघाडी अध्यक्ष नियुक्त्या जिल्हाध्यक्ष या नात्याने अ‍ॅड. पटवर्धन यांनी केल्या. त्यानंतर बूथ कमिट्याही गठित केल्या.
तीन वर्षांपूर्वी कोरोना कालावधीत जिल्ह्यात भाजपाला अॅड. पटवर्धन यांच्या रूपाने नवसंजीवनी मिळाली. निष्कलंक चारित्र्याच्या या नेत्याने पक्षवाढीसाठी शिस्तबद्ध नियोजन केले. वेगवेगळ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश झाला. भाजपच्या दक्षिण रत्नागिरी संपर्क कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले. कॉर्पोरेट दर्जाचे हे कार्यालय असून, येथे कार्यकर्त्यांचा राबता वाढला आहे. भाजपच्या नेत्यांनी ध्येयधोरणाशी एकनिष्ठ राहत पक्ष मजबूत व एकसंधपणे काम केल्यास भाजपची संघटनात्मक ताकद बळकट झालेली दिसेल.
--
भूषवत असलेली पदे
सहकार क्षेत्रातील कार्य-
* गेली ३२ वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत
* अध्यक्ष- स्वामी स्वरूपानंद पतसंस्था, संचालक-रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सलग ४ वेळा संचालक म्हणून निवड
* संचालक- महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन
* संस्थापक अध्यक्ष- रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन
* अध्यक्ष- रत्नागिरी जिल्हा हौसिंग सोसायटी फेडरेशन
* अध्यक्ष- कोकण विभाग पतसंस्था फेडरेशन
* अध्यक्ष- रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय
* कार्याध्यक्ष- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन
* थिंक टॅंक सदस्य- राज्य पतसंस्था चळवळ
* इंडिपेंडंट डायरेक्टर- गोवा शिपयार्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com