
संक्षिप्त
पान २ साठी, संक्षिप्त
रानतळे महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९७.४६ टक्के
राजापूर ः बज्मे उर्दू अदब संचलित येथील नॅशनल इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय रानतळे राजापूरचा बारावी परीक्षेचा निकाल ९७.४६ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेमध्ये अलिशा नाईक आणि विज्ञान शाखेमध्ये ताझीम इसब यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या कनिष्ठ महाविद्यालयातून ७९ विद्यार्थ्यांपैकी ७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. अलिशा नाईक ९०.३३ टक्के, द्वितीय तमन्ना खान ८९.६६ टक्के तर फिजा काझी ८८.८३ टक्के याने तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेचा ९४.८७ टक्के निकाल लागला. त्यामध्ये ताझीम इसब ८६ टक्के, फिजा पीरखान ८४.८३ टक्के, शीबा बोरकर ७३.३३ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने अभिनंदन केले आहे.
कोंड्ये महाविद्यालयात कोमल शिवगण प्रथम
राजापूर ः तालुक्यातील कोंड्ये येथील इंद्रनील तावडे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामध्ये वाणिज्य शाखेमध्ये कोमल शिवगण (७६.५० टक्के), ऋणाली बाईत (६९.५०), समिक्षा शिवगण (६८.८३) यांनी तर कला शाखेमध्ये नेहा कांबळे (६८.१७), यश पिटलेकर (६४.८४), अनिकेत शिवगण (६२.८३) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
वाटूळ विद्यालयात श्रुती सावंत प्रथम
राजापूर ः तालुक्यातील वाटूळ येथील आदर्श विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज ऑफ आर्टस् या कनिष्ठ विद्यालयाचा बारावीचा निकाल ८२.८५ टक्के लागला आहे. यामध्ये श्रुती सावंत (७७.८३), सर्वदा करपे (७४.८३), अनघा नेमण (६४.६७) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक यांनी अभिनंदन केले.
०५११४
गोडे महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९७.४७ टक्के
राजापूर ः राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजापूर हायस्कूल व गोडे-दाते कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९७.४७ टक्के लागला आहे. त्यामध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेमध्ये किशोर बोडेकर, कला शाखेमध्ये साक्षी साठविलकर, वाणिज्य शाखेमध्ये गायत्री जड्यार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कला शाखेतून ११२ विद्यार्थ्यांपैकी १०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये साक्षी साठविलकर (६७.६७) प्रथम, ऋती चव्हाण (६६.८३) द्वितीय तर, गुरूनाथ ठाकुरदेसाई याने (६४.६७) तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागताना ११३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये गायत्री जड्यार (८४.६७) प्रथम, अमृता मांडवे (८४.३३) द्वितीय तर साहिल जाधव याने (७७.३३) तृतीय क्रमांक पटकावला.
‘नवजीवन’चा निकाल ९३.६९ टक्के
राजापूर ः तालुक्यातील नवजीवन हायस्कूलचा बारावी परीक्षेचा निकाल ९३.६९ टक्के लागला असून, वाणिज्य शाखेमध्ये राजश्री मांडवकर, विज्ञान शाखेमध्ये सिद्धी मोहिते आणि कला शाखेमध्ये सना मौला यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये २३८ पैकी २२३ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ९२.७० टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ९६.८७ टक्के तर कला शाखेचा निकाल ८९.८७ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून ९६ विद्यार्थी परीक्षेस बसले पैकी ८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये अनुक्रमे राजश्री मांडवकर हिने (८५.३३ टक्के), श्रद्धा चव्हाण (८४.१७), साहिल भेरे (८०.६७) क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेतून ९६ पैकी ९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये सिद्धी मोहिते (८३.१७), आदिती शिवदे (७६.१७), यश परवडे (७२.५०) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला आहे. कला शाखेतून ४६ पैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये सना मौला (७१.६७) प्रथम, झोया मुल्ला (६९.५०) द्वितीय तर धनराज लिंगायत (६८) याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.