मिरजोळीत रस्त्यालगत लागलेल्या वणव्याने नागरिकांची धावाधाव

मिरजोळीत रस्त्यालगत लागलेल्या वणव्याने नागरिकांची धावाधाव

११ (पान २ साठी)

मिरजोळीतील वणव्याने नागरिकांची धावाधाव

चिपळूण, ता. २६ ः शहरालगतच्या मिरजोळी गावात चिपळूण-गुहागर मार्गावर गुरुवारी लागलेल्या वणव्याने स्थानिक रहिवाशांची धावाधाव उडाली. या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून ती आग तासाभरानंतर विझवली आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास टाकला.
मिरजोळी दत्तवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावरच हा भीषण वणवा लागला होता. बघता बघता ती आग वाढली. या परिसरात लोकवस्ती आहे. रस्त्यापासून काही अंतरावरच घरे आहेत. आग वाढू लागल्याने स्थानिक नागरिक घाबरले. एकमेकांना मदतीचा आवाज देऊन सर्वजण घराबाहेर पडले. आग विझवताना सर्वांचीच धावपळ उडाली. तासाभराने नळाचे पाणी मारून तेथील आग विझवण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग कोणी लावली, याचा शोध मात्र स्थानिक नागरिकांकडून घेतला जात आहे. दरम्यान, मिरजोळी परिसरात लोकवस्ती वाढत आहे. मोठमोठ्या गृहनिर्माण संकुलाच्या इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे गावामध्ये घरगुती कचऱ्याचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक ग्रामस्थ सूचनांकडे कानाडोळा करून रस्त्यालगत, मोकळ्या जागेत घरातील कचरा फेकतात. काहीवेळा या कचऱ्याला आग लावली जाते. असाच काहीसा प्रकार वणव्यालाही कारणीभूत ठरला असावा, अशी शंका स्थानिकांकडून उपस्थित करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com