संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

पान २ साठी, संक्षिप्त


अभ्यंकर महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत यश
रत्नागिरी ः अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोकण बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. महाविद्यालयाचा निकाल ९५.२५ टक्के लागला. शास्त्र शाखेचा एकूण निकाल ९२.१७ टक्के लागला. कला शाखेचा ९५.२८ टक्के व वाणिज्य शाखेचा ९९.७५ टक्के व एमसीव्हीसीचा निकाल १०० टक्के लागला. शास्त्र शाखेतून प्रथम पूर्वा दामले, अथर्व करमरकर (९२.५०), द्वितीय शिवम कीर (९२), कल्याणी केळकर (९०.८३) हिने तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेतून प्रथम सोनिया जाधव (९३.६७), द्वितीय जान्हवी जोशी आणि श्रावणी दाते (९१.३३), तृतीय दिशा लांजेकर (९०.८३) यांनी क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेतून प्रथम गौरी कुलकर्णी (९७.८३), द्वितीय पृथा ठाकूर आणि आत्मजा मुळ्ये (९७.६७) व तृतीय नुपूर रानडे (९७.५०) यांनी क्रमांक पटकावले. एमसीव्हीसी विभागामध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पायल मातल (८८.३३), शुभम मालप (८७.५०), विघ्नेश माने (८५.१७) यांनी पटकावला. र. ए. सोसायटीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपाध्यक्ष अॅड. विजय साखळकर, संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, उपप्राचार्य चिंतामणी दामले आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

०५१५५
गांगण, केळकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९७ टक्के
रत्नागिरी ः येथील श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य आणि (कै.) त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९७.८४ टक्के लागला. कला शाखेचा निकाल ९५.३४ टक्के लागला. यात प्रथम तितिक्षा साठे (७७.३३), द्वितीय कोमल गडदे (७६.६७), तृतीय आर्या जाधव (७३) यांनी यश मिळवले. वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम श्रावणी देवरूखकर (८३.६७), द्वितीय सायली कोल्हटकर (७८.१७), साक्षी कदम (७२.६७) यांनी क्रमांक मिळवले. विज्ञान शाखेचा निकाल ९८.०५ टक्के लागला. यात प्रथम देवी लवेकर (९२.८३), द्वितीय सोहिनी जोगळेकर (८४.८३) आणि तृतीय वेदांत भट (८४.१७) यांनी यश मिळवले.


चाकाळे ग्रामपंचायतीने बसवले दोन पथदीप
खेड ः तालुक्यातील चाकाळे ग्रामपंचायतीतर्फे बौद्धवाडी या ठिकाणी दोन पथदीप बसवण्यात आले. बौद्धवाडीमध्ये गेली अनेक वर्षे पथदीप नसल्याने रात्री मार्गक्रमण करताना ग्रामस्थांना त्रासदायक ठरत होते. ही समस्या सोडवण्यासाठी वाडीमध्ये पथदीप बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली होती. ग्रामसभेत या विषयावर चर्चा होऊन सरपंच श्रद्धा भिलारे, उपसरपंच अक्षय गमरे यांच्यासह ग्रा. पं. सदस्य व ग्रामसेविका मिनाक्षी सावंत यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यानुसार ग्रामपंचायतीने १०० मीटर वायर, दोन बल्बच्या साहाय्याने पथदीप बसवण्यात आले. यासाठी ग्रा. पं. कर्मचारी सुरेंद्र चव्हाण, काशिनाथ चव्हाण, वायरमन सागर मोरे, विनायक कडू यांनी मेहनत घेतली.


०५१६५
सुकीवली सरपंचपदी रोशनी चाळके
खेड ः तालुक्यातील सुकीवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रोशनी चाळके यांची सरपंचपदासाठी थेट झालेल्या पोटनिवडणुकीत त्या विजयी ठरल्या. शुक्रवारी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थ उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या सरपंच पोटनिवडणुकीमध्ये चाळके यांना गावातील मतदारांनी पसंती दिली. दरम्यान, अत्यंत प्रतिष्ठेची झालेल्या सुकीवली ग्रा. पं. च्या निवडणुकीमध्ये चाळके या ८२५ मतांनी विजयी झाल्या. त्या पदभार स्वीकारतेवेळी उपसरपंच बळीराम निकम, ग्रा. पं. सदस्य समीर राणीम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे, मिलिंद काते, विलास यादव, प्रभाकर जाधव, बबन जाधव, मनोहर जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.