
प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्षपदी नाईक
swt2612.jpg
05162
सिंधुदुर्गनगरीः प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक, संतोष राणे यांचा सत्कार करताना राजन कोरगावकर, नंदकुमार राणे व अन्य.
प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्षपदी नाईक
उपाध्यक्षपदी राणेः सिंधुदुर्गनगरीत निवड कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ः जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी नारायण नाईक तर उपाध्यक्षपदी संतोष राणे यांची निवड करण्यात आली. सर्वाना सोबत घेऊन पतसंस्थेचा कारभार प्रभावीपणे चालविन, अशी ग्वाही श्री. नाईक यांनी निवडीनंतर दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील पतपेढीच्या जिल्हा कार्यालयातील सभागृहात आज निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला यादव यांच्या उपस्थितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड झाली. यावेळी अध्यक्षपदी नाईक तर उपाध्यक्षपदी राणे यांची निवड करण्यात आली. यावेळी संचालक संतोष मोरे, सीताराम लांबर, मंगेश कांबळी, सचिन बेर्डे, विजय सावंत, श्रीकृष्ण कांबळी, संजय पवार, चंद्रसेन पाताडे, महेंद्र पावसकर, ऋतुजा जंगले, समीक्षा परब यांच्यासह प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस तथा पॅनल प्रमुख राजन कोरगावकर, पतपेढी मावळते अध्यक्ष नामदेव जांभवडेकर, जिल्हा सचिव सचिन मदने, माजी जिल्हाध्यक्ष नंदकिशोर राणे, अनंत राणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलच्यावतीने पतपेढीची निवडणूक लढवून यशस्वी झाल्यानंतर आमच्या पॅनेलच्या माध्यमातून सभासदांना दर्जेदार सोयी व पारदर्शी कारभार देण्याचा आमचा अजेंडा कायम राहील. यासाठी सर्व संघटनांना सोबत घेऊन कारभार करू. सभासदांच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ दिला जाणार नाही, असे प्रतिपादन भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे प्रमुख राजन कोरगावकर यांनी केले.
कोट
भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलच्यावतीने आम्ही सत्तारूढ झालो असलो तरी आता संचालक व पदाधिकारी म्हणून सर्वांना सोबत घेऊनच पतपेढीचा कारभार अधिक उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
- नारायण नाईक, नूतन अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक पतपेढी