
जिल्ह्यात आरटीईच्या 371 जागा रिक्त
जिल्ह्यात आरटीईच्या ३७१ जागा रिक्त
रत्नागिरी, ता. २६ ः शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) रत्नागिरी जिल्ह्यात आरटीईच्या ५५७ जागांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. अजूनही ३७१ जागा रिक्त आहेत. तीन वेळा मुदतवाढ देऊनही प्रवेशाची गती संथच आहे. प्राथमिक शिक्षण संचालनायातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यात प्रवेशासाठीच्या सोडतीतून ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. आत्तापर्यंत ६३ हजार ८६७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ९२८ जागा रिक्त होत्या. त्यापैकी ७२६ जणांना लॉटरी लागली होती. त्यापैकी ५५७ जणांनी प्रवेश घेतला आहे. यामुळे अजूनही ३७१ जागा रिक्तच आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. मात्र पालकांना सोयीची शाळा मिळत नसल्याने प्रवेश निश्चित केले जात नाहीत. त्यामुळे जागा रिक्त आहेत. निवड यादीतील विद्यार्थ्यांची मुदत संपल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठीच्या सूचना मिळण्याची प्रतीक्षा आहे.