रत्नागिरी-जिल्हा खनिकर्मला 74 कोटी 55 लाखांचा महसूल

रत्नागिरी-जिल्हा खनिकर्मला 74 कोटी 55 लाखांचा महसूल

खनिकर्मला ७४ कोटी ५५ लाखांचा महसूल

उद्दिष्टापेक्षा १२ कोटी जादा ; मनुष्यबळ कमी असताना उत्तम कामगिरी

रत्नागिरी, ता. २७ : जिल्हा खनिकर्म विभागाकडून जिल्हा प्रशासनाचा सर्वाधिक महसूल मिळतो. या विभागाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात उद्दिष्टापेक्षाही अधिक महसूल मिळवून दिला. ७४ कोटी ५५ लाख एवढा म्हणजे उद्दिष्टापेक्षाही ११९ टक्के जादा महसूल मिळाला आहे.
विविध उत्खननावरील रॉयल्टीतून जिल्हा खनिकर्मला महसूल मिळतो. तसेच गौण खनिजाच्या अवैध उत्खननावरील कारवाईतूनही या कार्यालयाला दंड महसूल मिळतो. २०२२-२३ कार्यालयाला ६२.६७ कोटींचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते. या कार्यालयात मनुष्यबळ कमी असतानाही जिल्हा खनिकर्म कार्यालयाने तब्बल ७४कोटी ५५ लाख एवढा महसूल मिळवला. दापोली ३ कोटी ३२ लाख १३ हजार, खेड प्रांत कार्यालयाकडून २ कोटी १२ लाख ६६ हजार, चिपळूण प्रांत कार्यालयाकडून ७ कोटी ९६ लख ६९ हजार, रत्नागिरी प्रांत कार्यालयाकडून ४ कोटी ४४ लाख ९७ हजार, राजापूर प्रांत कार्यालयाकडून सर्वांधिक म्हणजे ८ कोटी ८७ लाख ३९ हजार, अशी चांगली कामगिरी केली. जिल्हा खनिकर्म विभागाने गेल्या वर्षी ७४ कोटी ५५ लाख ५७ हजार एवढा महसूल मिळवला. म्हणजे उद्दिष्टापेक्षा सुमारे १२ कोटी जादा महसूल मिळाला आहे. जिल्हा खनिकर्म विभागातील मनुष्यबळ कमी आहे. या विभागाने उत्तम कामगिरी केली आहे. तसेच सुविधांची वानवा आहे. या विभागाला हक्काचे वाहन देखील नाही. संरक्षण घेऊन किंवा जीवाची बाजी लावून वाळू माफियांवर कारवाई करावी लागते, याची खंतही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर ही पाच प्रांत कार्यालये आहेत. वर्षभरात या पाचही कार्यालयांनी महसूल मिळविण्यात चांगली कामगिरी केली आहे. परंतु राजापूर प्रांत कार्यालयाने सर्वाधिक ८ कोटी ५७ लाख ३९ हजार ३४२ रुपये एवढा महसूल मिळविला आहे.


कोट
जिल्ह्याला २०२२-२३ वा आर्थिक वर्षासाठी शासनाकडून ६२.६८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, जिल्ह्यातील पाच प्रांत कार्यालये, नऊ तहसील कार्यालये आणि जिल्हा कार्यालय यांच्या उत्तम कामगिरीमुळे यंदा जिल्ह्याने उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ७४.५५ कोटींचा पल्ला आम्ही गाठला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा ११९ टक्के इतकी उद्दिष्टपूर्ती झाली आहे.
- दिग्विजय पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी, रत्नागिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com