जगबुडी नदीत कचरा फेकल्यास 5 हजार दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगबुडी नदीत कचरा फेकल्यास 5 हजार दंड
जगबुडी नदीत कचरा फेकल्यास 5 हजार दंड

जगबुडी नदीत कचरा फेकल्यास 5 हजार दंड

sakal_logo
By

४३ (पान ३ साठी)

जगबुडी नदीत कचरा फेकल्यास दंड

खेड नगरपालिका ; माहितीसाठी किनाऱ्यावर फलक

खेड, ता. २६ : शहरानजीक असेलल्या जगबुडी नदीपात्रात कचरा फेकणे आता महागात पडणार आहे. जगबुडी नदीपात्रात किंवा पात्रालगत कचरा टाकताना आढळल्यास पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये कारवाई करून ५ हजार रुपयांचा आर्थिक दंड आकारण्याचा निर्णय येथील पालिकेने घेतला आहे. याची माहिती देण्यासाठी तसा सूचना फलकही भोस्ते मार्गांवरील जगबुडी पुलावर लावण्यात आला आहे.
जगबुडी नदीपात्रात नजीकच्या ग्रामस्थांकडून फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे नदीपात्र दूषित होत आहे. बारमाही वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात तरंगणाऱ्या कचऱ्यामुळे नदीपात्राला कचराबुडीचेच स्वरूप प्राप्त झाले आहे. पालिकेकडून कचरा फेकणाऱ्यांवर कुठलीच ठोस कारवाई होत नाही. या पार्श्वभूमीवर जगबुडी नदीतील वाढते प्रदूषण रोखून कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी ’चला जाणूया नदीला’ अभियानाने पुढाकार घेत पालिकेला निवेदन दिले होते. नगर पालिका प्रशासनाने कुठलीही कार्यवाही न केल्याने अखेर पालिकेसमोर गुरुवारी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. त्याची दखल पालिकेने जगबुडी नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.