
कासार्डे महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के
५२१०
कासार्डे महाविद्यालयाचा
निकाल १०० टक्के
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २६ ः कासार्डे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे. कला शाखेतून दीक्षिता लाड तर वाणिज्य शाखेतून अमित तर्फे तर विज्ञान शाखेतून स्वरांगी जठार प्रथम क्रमांक मिळविला. शाखानिहाय अनुक्रमे विद्यार्थी असे ः दीक्षिता लाड (७६.८३), मालिनी लाड (६७.६७), सुरज दळवी (६४.३३).
वाणिज्य ः अमित तर्फे (८४.३३), सुश्मिता ठूकरुल (८४.१७), विशाखा राणे (७८.५०). विज्ञान ः स्वरांगी जठार (७२), नेहा काळे (७१.८३), चैत्राली कुडतरकर (७१.३३%). या सर्व उत्तीर्ण विद्यार्थी तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे स्थानिक व्यवस्था कमिटीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, माजी कार्याध्यक्ष तथा स्थानिक व्यवस्था कमिटी पदाधिकारी प्रभाकर कुडतरकर व सर्व पदाधिकारी प्राचार्य एम. डी. खाडये, पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.