-पेठमाप मुरादपूर पुलाचे काम प्रगतीपथावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-पेठमाप मुरादपूर पुलाचे काम प्रगतीपथावर
-पेठमाप मुरादपूर पुलाचे काम प्रगतीपथावर

-पेठमाप मुरादपूर पुलाचे काम प्रगतीपथावर

sakal_logo
By

.४५ (पान ३ साठी)

- ratchl२६५.jpg ः

२३M०५२०३
चिपळूण ः पेठमाप पुलाचे सुरू असलेले काम.
-------------

पेठमाप मुरादपूर पुलाचे काम प्रगतीपथावर

६ पिलरचे काम पूर्ण ः पावसानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम

चिपळूण, ता. २६ ः शहरातील वाहतूक कोंडीवर पर्याय ठरणारा व दळणवळण सुलभ करणारा येथील पेठमाप मुरादपूर पुलाचे काम आता प्रगतीपथावर आहे. पुलाच्या १४ पैकी ६ पिलरचे काम पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी आणखी दोन पिलरचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पावसाळा संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामाला तातडीने सुरवात करण्याचे नियोजन ठेकेदार कंपनीने केले आहे. त्यामुळे नव्या वर्षात हे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.
वाशिष्ठी नदीच्या दोन बाजूला पेठमाप आणि मुरादपूर ही दोन मोठी गावे वसलेली आहेत. वाशिष्ठीच्या तीव्र आणि विस्तीर्ण प्रवाहामुळे जवळ असून देखील या दोन गावामध्ये मोठे अंतर निर्माण होऊन दळणवळणाचा मार्गदेखील संपुष्टात आला आहे; मात्र काही प्रमाणात वाहतूक आणि नागरिकांसाठी येण्या-जाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने येथे फरशी उभारण्यात आली होती. त्यावरून लहान वाहनांची वाहतूक व नागरिक ये-जा करत होते. नंतर मात्र ही फरशीदेखील नामशेष झाली. त्यामुळे या नदीवर पूल व्हावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती.
आमदार शेखर निकम यांनी या मागणीकडे लक्ष देत शासनस्तरावरून पुलासाठी १२ कोटींचा निधी मंजूर केला. त्यानुसार चिपळूण पालिकेने सर्व कार्यवाही पूर्ण केल्यानंतर पुलासाठी १२ कोटीचा निधी मिळाला. त्यानुसार तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुणे येथील ए. आर. कन्स्ट्रक्शन या कंपनीला पुलाच्या बांधकामाचा ठेका देण्यात आला. त्याप्रमाणे ठेकेदार कंपनीने दोन महिन्यांपूर्वी या कामाला सुरवात केली.
त्यानंतर कमी कालावधीत पुलाच्या एकूण पिलरपैकी ६ पिलरचे काम पूर्ण केले. पावसाळ्यापूर्वी आणखी २ पिलरचे काम पूर्ण होणे शक्य आहे. पावसाळ्यात नदीचा प्रवाह अधिक असल्याने झालेल्या पिलरवरच गर्डर चढवण्याचे काम पावसाळ्यात सुरू ठेवले जाणार आहे; मात्र उर्वरित पिलरचे काम पावसाळा संपताच सप्टेंबरपासून पुन्हा सुरू केले जाणार आहे.
हा पूल पूर्ण झाल्यानंतर चिपळूण शहरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पेठमाप, मुरादपूर, दादर मोहल्ला, बेबल मोहल्ला व आजुबाजूच्या गावांना दळणवळणाचे एक उत्तम साधन उपलब्ध होणार आहे.