तीन जागांसाठी आता निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन जागांसाठी आता निवडणूक
तीन जागांसाठी आता निवडणूक

तीन जागांसाठी आता निवडणूक

sakal_logo
By

तीन जागांसाठी आता निवडणूक

ग्रामसेवक पतसंस्था निवडणूक; दहा बिनविरोध, ३ जूनला मतदान

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ ः जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या १३ जागांसाठी १७ अर्ज प्राप्त झाले होते. यातील एका उमेदवाराने आज अर्ज मागे घेतल्यामुळे १३ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात होते. १३ पैकी १० जागा बिनविरोध झाल्या असून केवळ तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी ३ जूनला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत सिंधुदुर्गनगरी येथील ग्रामसेवक भवन येथे मतदान प्रक्रिया राबविली जाणार असून यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या २०२३-२४ ते २०२८-२९ या पाच वर्षाकरिता नवीन संचालक मंडळ निवडण्यासाठी निवडणूक जाहीर केली आहे. श्रीकृष्ण मयेकर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. आठ तालुक्यांसाठी आठ तालुका मतदारसंघ आहेत. यात वेंगुर्लेमधून सदाशिव मनमोहन अंधारी, दोडामार्गमधून अमित नारायण दळवी, मालवणमधून युगलकिशोर नामदेव प्रभूगावकर, देवगडमधून शमसुद्दिन आब्बास साटविलकर, वैभववाडीमधून घनश्याम शिवराम नावळे, कणकवलीमधून दत्तात्रय नामदेव तळवडेकर, सावंतवाडीमधून प्रफुल्ल शशिकांत धुरी यांचे एका जागेसाठी एक अर्ज आल्याने हे सात तालुका मतदारसंघ बिनविरोध झाले आहेत. मात्र, कुडाळ तालुक्यातून वैभव महादेव सावंत आणि चेतना संतोष माणगावकर या दोघांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील कोणीच माघार न घेतल्याने तालुका मतदार संघातील एका जागेसाठी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.
महिला संचालक दोन जागांसाठी मीनाक्षी सखाराम पिळणकर आणि महानंदा काशिनाथ वराडकर या दोघांचेच अर्ज आल्याने या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. इतर मागास प्रवर्ग एका जागेसाठी विवेक दत्तात्रय नर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ही निवड सुद्धा बिनविरोध झाली आहे. मात्र, अनुसूचित जाती जमाती एका जागेसाठी मंगेश सदाशिव साळसकर, नितेश गोविंद तांबे, महेश तुकाराम चव्हाण या तिघांचे अर्ज प्राप्त झाले होते. यातील महेश चव्हाण यांनी अर्ज मागे घेतल्याने या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात राहिले आहेत. भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग या एका जागेसाठी नामदेव रामचंद्र तांबे, उमेश तुळशीदास खोबरेकर यांनी अर्ज केले आहेत. यातील कोणीच अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे या जागेसाठी सुद्धा निवडणूक होणार आहे.
--------------
चौकट
३२१ सभासद मतदार निश्चित
एकूण १३ संचालक निवडून द्यायचे असून यात आठ तालुका मतदार संघातून आठ संचालक, अनुसूचित जाती जमातीमधून एक संचालक, दोन महिला प्रतिनिधी, एक इतर मागास प्रतिनिधी, एक भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग निवडले जाणार आहेत. यासाठी ३२१ सभासद मतदार निश्चित झाले आहेत.