मोटार अपघातात तिघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटार अपघातात तिघे जखमी
मोटार अपघातात तिघे जखमी

मोटार अपघातात तिघे जखमी

sakal_logo
By

४९ (पान ३ साठी)

मोटार अपघातात तिघे जखमी

दाभोळ, ता. २६ : हयगयीने व अविचाराने वाहन चालवून अपघात झाल्याने व वाहनातील प्रवाशांच्या दुखापातीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ मे रोजी संतोष मुरलीधर झडकर हे आपल्या कुटुंबीयासमवेत दापोली ते मुंबई हा प्रवास मोटारीने करत होते. मोटार इरफान जरदोस्त चालवत होते. दुपारी चारचाकी दापोली शहराजवळील खोंडा येथे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या टेलिफोनच्या खांबावर जावून आपटली. या अपघातात लीना हडकर, संतोष झडकर यांना व त्यांचा मुलगा तसेच चालक इरफान जरदोस्त यांना किरकोळ दुखापत झाली. या अपघात प्रकरणी संतोष झडकर यांनी चालक इरफान जरदोस्त यांचे विरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.