
आंबोली येथे स्वच्छता मोहीम
05257
आंबोली ः पूर्वीचा वस या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
आंबोली येथे स्वच्छता मोहीम
सिंधुदुर्गनगरी ः आंबोली वनक्षेत्रमार्फत आंबोली मुख्य धबधबा आंबोली पूर्वीचा वस या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे आयोजन आंबोली वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी केले होते. या मोहिमेमध्ये आंबोली सरपंच पालेकर, पारपोली सरपंच, ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आंबोली मुख्य धबधबा व पूर्वीचा वस मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली. यात विशेषत: पिशव्या प्लास्टिक गोळा करण्यात आले. हा उपक्रम केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून यावर्षीच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या जीवनशैलीमध्ये वेगवेगळे ७५ पर्यावरण पूरक गुण अंगीकृत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामध्ये जवळच्या अंतरासाठी सायकल वापरणे, सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळणे, विजेचा वापर कमी करणे, आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे या गोष्टींचा समावेश केला आहे. आंबोलीतील स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
----------------
05258
सिंधुदुर्गनगरी ः तृप्ती टेमकर यांचा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तृप्ती यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार
सिंधुदुर्गनगरी ः सहायक संचालक वित्त व लेखा वर्ग-१ पदी निवड झालेल्या तृप्ती टेमकर यांचा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देवून सत्कार केला. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात हवालदार पदावर काम करणारे कृष्णा टेमकर यांची ती कन्या आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी वडील कृष्णा टेमकर, बंधू अनंत टेमकर, स्थानिक निधी कार्यालयाचे लेखाधिकारी पांडुरंग थोरात आदी उपस्थित होते.