वेंगुर्लेतील तालुक्यातील जिर्ण
विद्युत खांब बदलण्याची मागणी

वेंगुर्लेतील तालुक्यातील जिर्ण विद्युत खांब बदलण्याची मागणी

05298
वेंगुर्ले ः येथे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना सुजाता पडवळ. समवेत अन्य महिला.

तुळस परिसरातील जीर्ण विद्युत खांब
तत्काळ बदलण्याची मागणी
वेंगुर्ले, ता. २७ ः तुळस (ता. वेंगुर्ले) पंचक्रोशीतील गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी विद्युत खांब जीर्ण झालेले आहेत. काही ठिकाणी विद्युत वाहिनींवर झाडी वाढली असून आगामी पावसाळ्यात वादळी वारे, जोराचा पाऊस यामुळे असे खांब पडून नुकसान, तसेच जीवितहानी घडू शकते. त्याचप्रमाणे विद्युत प्रवाहही खंडित होऊ शकतो. त्यामुळे तुळस गावासह पंचक्रोशीतील होडावडा, वजराट, मातोंड, अणसुर, पाल गावात जीर्ण विद्युत खांब लवकरात लवकर बदलण्यात यावेत, लाईनवर आलेली झाडी साफ करण्यात यावी, यासंदर्भात तुळस येथील सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी वेंगुर्ला येथील उप कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी उपविभाग वेंगुर्ले या कार्यालयास भेट देत ‘महावितरण’ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात निवेदन दिले. प्रतिवर्षी पावसाळ्यात तुळस गावासह पंचक्रोशीतील गावांमध्ये वीज समस्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत राहावा, यादृष्टीने महावितरण कंपनीने आतापासूनच त्याचे नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशीही मागणी महिलांच्यावतीने करण्यात आली. यावेळी भक्ती आरोंदेकर, विद्या आंगचेकर, मनाली चुडजी आदी उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com