शिक्षण धोरण समितीवर
सुषमा मांजरेकर यांची निवड

शिक्षण धोरण समितीवर सुषमा मांजरेकर यांची निवड

टीपः swt२६२१.jpg मध्ये फोटो आहे.
सुषमा मांजरेकर

शिक्षण धोरण समितीवर
सुषमा मांजरेकर यांची निवड
सावंतवाडी, ता. २६ ः नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणीसाठी व अभ्यासक्रम निश्चितीसाठी राज्याने समितीची स्थापना केली असून या समितीच्या सदस्यपदी आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसच्या उच्च माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा मांजरेकर (गोडकर) यांची निवड झाली.
राज्याचे सहसचिव ई. मू. काझी यांची सहिनिशी याबाबतचा आदेश राज्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. या निवडीबद्दल सौ. मांजरेकर यांचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नीलेश परब, स्कूल कमिटी चेअरमन हेमंत कामत सचिव शांताराम गावडे, सर्व संस्था पदाधिकारी, संचालक, शिक्षक पालक संघ, मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे. सौ. मांजरेकर या गेली २१ वर्षे आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागामध्ये त्या मराठी व हिंदी विषयाचे अध्यापन करीत आहेत. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांच्या अंधायुग या नाटकाचे त्यांनी मराठीत पुनर्लेखन केले असून या नाटकाचे प्रयोगही महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा, महाराष्ट्र कामगार कल्याण नाट्य स्पर्धा विक्रोळी मुंबई, व अन्य ठिकाणी प्रयोग झाले आहेत. याशिवाय शुद्ध लेखनात येणाऱ्या समस्या व उपाययोजना या विषयावर लघु प्रबंध, कोरोना कालावधीतील आँनलाईन शिक्षण व उपाययोजना या विषयावर दीर्घ निबंध लेखनही केले आहे. कोरोना काळातील आँनलाईन शाळा व शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी हे उपक्रमही सौ मांजरेकर यांनी राबविले आहेत. त्यांच्या अध्यपनचे व्हिडियोही यू ट्यूबवर आहेत. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दाखल घेऊन राज्य शासन शिक्षण विभागाने त्यांची राज्यस्तरीय समितीवर निवड केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com