पान एक-कोलगावातील रिक्षा व्यवसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-कोलगावातील रिक्षा व्यवसायिकाची
गळफास घेऊन आत्महत्या
पान एक-कोलगावातील रिक्षा व्यवसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

पान एक-कोलगावातील रिक्षा व्यवसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By

पान एक

रिक्षा व्यवसायिकाची
कोलगावात आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः कोलगाव स्मशानभूमी परिसरातील झाडाला रिक्षा व्यावसायिकाने नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. रामचंद्र तुकाराम म्हापसेकर (वय 54, रा. कोलगांव-म्हापसेकरवाडी) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसून याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी ः कोलगाव स्मशानभूमी परिसरात सकाळी रिक्षा उभी असलेली दिसली. ग्रामस्थांनी जाऊन पहिले असता रामचंद्र म्हापसेकर यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेची खबर ग्रामस्थांनी भाऊ साबाजी म्हापसेकर यांना दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत खात्री केली व पोलिसांना याची कल्पना दिली. याबाबत पोलिस ठाण्यात त्यांचे भाऊ साबाजी म्हापसेकर यांनी खबर दिली असून त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक यशवंते, पोलिस नाईक यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. ते शहरात रिक्षा चालवायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.