महिला पोलिस हवालदार
कदम यांचे निधन

महिला पोलिस हवालदार कदम यांचे निधन

05272
प्रशंसा कदम

महिला पोलिस हवालदार
कदम यांचे निधन
कुडाळ, ता. २६ ः जिल्हा पोलिस अधीक्षक महिला अत्याचार निवारण कक्ष व कुडाळ पोलिस स्टेशन येथे प्रति नियुक्तीवर असलेल्या महिला पोलिस हवालदार सौ. प्रशंसा प्रितम कदम (वय ४०, रा. सरंबळ) यांचे अल्पशा आजाराने आज सायंकाळी निधन झाले. सौ. कदम या यापुर्वी पाच वर्षे कुडाळ पोलिस स्टेशन येथे कार्यरत होत्या. यानंतर त्यांची जिल्हा अधीक्षक कार्यालय येथे महिला अत्याचार निवारण कक्षात नियुक्ती झाली होती. कुडाळ पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस प्रितम कदम यांच्या त्या पत्नी होत.
---
05271
कल्पना परब यांचे निधन
ओटवणे, ता. २६ ः कारिवडे पेडवे हळदीचा कणा येथील रहिवाशी सौ. कल्पना वसंत परब (६८) यांचे आज पहाटे निधन झाले.
येथील वसंत परब यांच्या त्या पत्नी होत तर प्रसिद्ध बालकवी तथा शिरशिंगे मळई प्राथमिक शाळेचे शिक्षक मनोहर परब आणि एकनाथ परब यांच्या त्या मातोश्री होत.
---

05275
रमेश शेर्लेकर यांचे निधन
बांदा, ता. २६ ः मडुरा शेर्लेकरवाडी येथील रमेश कृष्णा शेर्लेकर (वय ७५) यांचे मंगळवारी चेंबूर टिळकनगर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. मडुरा तिठा येथील जय बजरंगबली सांस्कृतिक मंडळाचे सदस्य अनिल शेर्लेकर यांचे ते वडील होत.
-----------------
05274
वासुदेव राऊळ यांचे निधन
सावंतवाडी, ता. २६ ः तळकट कट्टा (ता. दोडामार्ग) येथील माजी पोलिसपाटील वासुदेव लक्ष्मण राऊळ (वय ७८) यांचे गुरुवारी निधन झाले. तळकट ग्रामपंचायत सदस्य शशिकांत राऊळ यांचे ते वडील होत. राऊळ हे सामाजिक कार्यातही सक्रिय सहभागी होत असत.
---------------
05273
संजय ताम्हणकर यांचे निधन
तळेरे, ता. २६ ः साळिस्ते-ताम्हणकरवाडी येथील संजय वामन ताम्हणकर (वय ४०) यांचे बुधवारी अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडिल, भाऊ, बहीण असा मोठ्ठा परिवार आहे. निवृत्त पोस्टमन वामन ताम्हणकर यांचा तो मुलगा होता.
--
५१२८
लता आईर यांचे निधन
कणकवली : बांदिवडे (ता. मालवण) येथील लता लक्ष्मण आईर (वय ५९) यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com