जानवली नदीपात्रात होणार केटी बंधारा

जानवली नदीपात्रात होणार केटी बंधारा

05351
कणकवली : शहरातील जानवली नदीपात्रालगत केटी बंधाऱ्यासाठी माती परीक्षण सुरू करण्यात आले आहे.

केटी बंधाऱ्यासाठी माती परीक्षण

जानवली नदीपात्र; आराखडा मंजुरी अंतिम टप्प्यात

कणकवली, ता. २७ : शहरातील जानवली नदीपात्रात पुढील वर्ष अखेरपर्यंत केटी बंधारा होण्याच्या दृष्‍टीने कार्यवाही सुरू झाली आहे. यात नदीपात्र तसेच लगतच्या भागातील माती परीक्षणाचे काम सुरू केले आहे, तर बंधाऱ्याचा आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला असून त्‍याला लवकरच मंजुरी मिळणार असल्‍याची माहिती कणकवली नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
शहरालगतच्या गड नदीपात्रात दोन बंधारे आहेत. त्याच धर्तीवर जानवली नदीपात्रात केटी बंधारा बांधला जावा, अशी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती, तर दोन महिन्यांपूर्वी कणकवली नगरपंचायतीमध्ये आलेल्‍या श्री. चव्हाण यांनी जानवली नदीपात्रात केटी बंधारा उभारण्याच्या दृष्‍टीने तातडीने अंदाजपत्रक तयार करून पाठविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना दिले होते.
---
दोन दिवसांपासून माती परीक्षण
दोन दिवसांपासून जानवली नदीपात्र आणि परिसरात माती परीक्षणाचे काम सुरू केले आहे. त्‍यामुळे बंधाऱ्याच्या कामाला गती मिळणार हे स्पष्‍ट झाले आहे. जानवली नदीत होणाऱ्या केटी बंधाऱ्याचा मोठा फायदा कणकवली शहराच्या उत्तरेकडील भागातील नागरिकांना तसेच जानवली आणि कलमठ गावातील नागरिकांनाही होणार आहे.
--
कोट
केटी बंधाऱ्यासह जानवली नदीपात्रात गणपतीसाणा येथे मोठा पूल व्हावा, अशीही मागणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. हा पूल झाला तर जानवली आणि कणकवली ही गावे जोडली जाणार असून जानवली नदीकाठच्या परिसरात विकासाची मोठी संधी निर्माण होणार आहे.
- समीर नलावडे, माजी नगराध्यक्ष, कणकवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com