Thur, Sept 21, 2023

‘ए. जी.’चा निकाल ८३.६६ टक्के
‘ए. जी.’चा निकाल ८३.६६ टक्के
Published on : 27 May 2023, 12:11 pm
‘ए. जी.’चा निकाल ८३.६६ टक्के
दाभोळः दापोली तालुक्यातील ए. जी. हायस्कूल व ज्युनि. कॉलेज दापोलीचा १२ वी परीक्षेचा निकाल ८३.६६ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ८८.१२ टक्के लागला असून, साक्षी कोळंबे ही विद्यार्थिनी ८९.५० टक्के गुण मिळवून प्रथम, मेहविश धामणकर ८९.१६ टक्के गुण मिळवून द्वितीय तर प्रेरणा गांधीने ८८.१६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. वाणिज्य शाखेतून श्रुती म्हशीलकर ९०.५० टक्के गुण मिळवून प्रथम तिचीच बहिण श्रेया म्हशीलकर ८९.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय, आर्यन सावंत याने ८४.६६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रमात अनुक्रमे सुयोग वेलदूरकर (७४.१६) प्रथम, ओमकार गोरीवले (७३.१६) द्वितीय तर आदित्य गुजरने ६६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.