वेंगुर्लेत पाणीपुरवठा कामांचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत पाणीपुरवठा कामांचे भूमिपूजन
वेंगुर्लेत पाणीपुरवठा कामांचे भूमिपूजन

वेंगुर्लेत पाणीपुरवठा कामांचे भूमिपूजन

sakal_logo
By

05360
वेंगुर्ले ः विकासकामांचे भूमिपूजन प्रसंगी शिक्षणमंत्री दीपक केसरकर व अन्य.

वेंगुर्लेत पाणीपुरवठा कामांचे भूमिपूजन
वेंगुर्ले, ता. २७ ः येथील नगरपरिषद हद्दीतील नळपाणी पुरवठा योजनेसाठी अल्‍ट्रासोनिक स्वयंचलित वॉटर मीटर पुरवठा करून कार्यान्वित करणे व पाणीपुरवठा योजना सुधारीत करण्यासाठी शहरातील अस्तित्‍वातील वितरण वाहिन्‍या बदलणे (पहिला टप्‍पा) या कामांचा भूमिपूजन सोहळा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते कॅम्प येथे नुकताच झाला.
वेंगुर्ले नगरपरिषदेला १४७ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली असून नगरपरिषदेच्‍या शिरपेचात मानाचा तुरा ठरावा, अशी आणखी दोन कामे शहरात होत आहेत. या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांचे स्वागत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडकर आदींसह प्रशांत आपटे, सुनील डुबळे, नम्रता कुबल, ॲड. बाविस्कर, संतोष परब, डॉ. आर. एम. परब, गणपत केळुसकर, ठेकेदार एस. एल. ठाकूर आदी उपस्थित होते.