फणसवणे कपिलनगर ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

फणसवणे कपिलनगर ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

फणसवणे कपिलनगर ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण
संगमेश्वर, ता. २७ः उमरे धरणातील पाणीसाठा संपल्याने प्रादेशिक नळपाणी योजना बंद पडली आहे. त्यामुळे या योजनेवरील १० गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
उमरे धरणावरी प्रादेशिक नळपाणी योजना बंद होण्यापूर्वी प्रशासनाने लोकांच्या पाण्याची सोय करावी यासाठी ग्रामस्थांनी माजी जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या रचना महाडिक, आमदार शेखर निकम, तालुक्याचे तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी चौघुले यांच्याशी चर्चा केली होती. त्या वेळी पाण्याचे योग्य ते नियोजन होईल, असे आश्वासन लोकप्रतिनिधींना दिले होते. त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालयानेदेखील आपापल्या कार्यक्षेत्रात योग्य ते नियोजन करावे, असे आदेश शासनाने दिले होते. मात्र फणसवणे कपिल नगरमधील ग्रामस्थांना एक हजार लिटर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. कपिल नगरसाठी देवरूख पंचायत समितीकडून रविवारी सायंकाळी पाण्याचा टॅंकर आला होता. त्या वेळी चार ते पाच भांडी याप्रमाणे वाटप करण्यात आले होते. एक हजार लिटर पाण्यासाठी हजार ते बाराशे रुपये पाण्यासाठी ग्रामस्थांना मोजावे लागत आहेत. ग्रामपंचायत उपाययोजना न करता पंचायत समितीवर अवलंबून असलेली दिसते. त्यामुळे दहा गावातील नागरिकांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com