रेल्वे आरक्षण केंद्र पूर्ववत 
करण्याची भाजपची मागणी

रेल्वे आरक्षण केंद्र पूर्ववत करण्याची भाजपची मागणी

05365
अशोक सावंत

रेल्वे आरक्षण केंद्र पूर्ववत
करण्याची भाजपची मागणी
मालवण : जिल्ह्यातील बंद असलेले रेल्वे आरक्षण केंद्र (TBA) सेवा पुन्हा सुरू व्हावे, या मागणीचे निवेदन भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, १९९९ पासून मालवण येथे कोटा सिस्टीममधून विनातक्रार कन्फर्म रेल्वे तिकिटे उपलब्ध होत होती; मात्र कोरोना काळात ही सेवा अचानक रेल्वेकडून बंद करण्यात आली. ही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे मालवण पंचक्रोशीतील कोकणी लोकांना ऑनलाईन तिकिटे मिळणे अशक्यप्राय झाले आहे. सुरू असलेली ही तिकीट सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली होती; मात्र विनातक्रार अशी आरक्षण सेवा केंद्रे रेल्वे बोर्डाने बंद केल्याने कोकणी माणसाची मोठी गैरसोय झाली आहे. याप्रश्नी रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा. मुंबईहून परत येण्यासाठीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटा मिळणे आवश्यक आहे. त्याबाबतही पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे.
................
‘अतिरिक्त शुल्काचा गॅस ग्राहकांना भुर्दंड’
आचरा : घरगुती गॅस सिलिंडरची पळसंब गावात घरपोच सेवा देताना ग्राहकांकडून अतिरिक्त आकारणी केली जात असल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. याबाबत पळसंबचे सरपंच महेश वरक यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस सिलिंडर घरपोच देताना नियमित आकारापेक्षा चाळीस ते पंचेचाळीस रुपये अतिरिक्त आकार घेतला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत. यादृष्टीने संबंधित यंत्रणेला अतिरिक्त आकारणी करू नये याबाबत सूचना देण्यासाठी पळसंबचे सरपंच महेश वरक यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com