प्रांताधिकारी ऐश्वर्या कळूसे यांचा
आंगणेवाडीवासीयांतर्फे सत्कार

प्रांताधिकारी ऐश्वर्या कळूसे यांचा आंगणेवाडीवासीयांतर्फे सत्कार

M05370
आंगणेवाडी ः येथे नूतन प्रांताधिकारी ऐश्वर्या कळुसे यांचा बाळा आंगणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रांताधिकारी ऐश्वर्या कळुसे यांचा
आंगणेवाडीवासीयांतर्फे सत्कार
मालवण : कुडाळ-मालवणच्या नूतन प्रांताधिकारी ऐश्वर्या कळुसे यांनी आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी आंगणे कुटुंबीयांच्या वतीने आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष बाळा आगणे यांनी त्यांचे स्वागत करून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी कळुसे यांनी श्री देवी भराडी मातेचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी मोठे असून, लोकाभिमुख सेवा जिल्ह्यात देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असे सांगितले. आंगणे कुटुंबीयांचे हे प्रेम माझ्यासाठी खूप मोलाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. याबरोबर प्रथमच नूतन मंडळ अधिकारी झालेल्या एम. एस. चव्हाण यांचाही सत्कार आंगणे कुटुंबीयांतर्फे करण्यात आला. तलाठी ए. के. देसाई, ग्रामसेवक युगल प्रभूदेसाई, आंगणेवाडी विकास मंडळाचे सेक्रेटरी मधुकर आंगणे, बाबू आंगणे, अनंत आंगणे, चंद्रकांत आंगणे, सुरेश आगणे, सतीश आगणे, सुधाकर आगणे, रघुनाथ आंगणे, संदेश आंगणे, श्री. वराडकर आणि कुटुंबीय उपस्थित होते.
--------
05369
आचरा ः ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ज्येष्ठांना वयाच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांना आचऱ्यात दाखले
आचरा : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या दाखल्यांचे वितरण केले. शासनाच्या ज्येष्ठांसाठी असलेल्या योजनांसाठी वयाच्या दाखल्यांची आवश्यकता असते. यासाठी शासन आपल्या दारीअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल मेस्त्री यांच्या उपस्थितीत आचरा भागातील ६५ वर्षांवरील एकूण ८० नागरिकांना वयाच्या दाखल्यांचे वितरण केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक कांबळी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com