प्रा. गोविंद काजरेकर यांना ‘धम्मपाल रत्नाकर’ पुरस्कार

प्रा. गोविंद काजरेकर यांना ‘धम्मपाल रत्नाकर’ पुरस्कार

05376
कोल्हापूर ः येथे डॉ. गोविंद काजरेकर यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

प्रा. गोविंद काजरेकर यांना
‘धम्मपाल रत्नाकर’ पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः प्रा. डॉ. गोविंद काजरेकर यांच्या ‘सुन्नतेचे सर्ग’ या दुसऱ्या कवितासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा ‘धम्मपाल रत्नाकर’ हा राज्यस्तरीय पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रा. काजरेकर हे महाराष्ट्रातील एक नामवंत कवी आणि समीक्षक असून त्यांचे या आधी ‘उरल्या सुरल्या जगण्याचे रिमिक्स’, हा कवितासंग्रह तर ‘राजन गवस यांचे कथात्म साहित्य’, ‘कोकणातील कृषी संस्कृती आणि लोकगीते’, ‘समकालीन कविता सांस्कृतिक परिप्रेक्ष’ आदी महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित आहेत. ‘सुन्नतेचे सर्ग’ या कवितासंग्रहात त्यांनी समकालीन सामाजिक जीवनातील परिवर्तनावर मार्मिक भाष्य केले आहे. या आधी त्यांना राजर्षी छत्रपती शाहू साहित्य गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. माणिकराव साळुंखे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, समीक्षक रवींद्र ठाकूर, रफिक सूरज, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळबुळ, पत्रकार विजय चोरमारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीपक बोरगावे, कविता मुरूमकर, केशव देशमुख, कविता ननावरे या मान्यवर कवींनाही पुरस्कार देण्यात आले. काजरेकर यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, बांदाचे अध्यक्ष डी. बी. वारंग, गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी वर्ग आणि मित्रपरिवाराने अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com