रानकुत्रा संकटात न येण्यासाठी..............

रानकुत्रा संकटात न येण्यासाठी..............

rat२७p९.jpg
5378
रानकुत्रा

जागतिक रानकुत्रा दिन विशेष.............लोगो

इंट्रो

फार पूर्वी Rudyard Kipling (रूडयार्ड किपलिंग) यांच्या जंगलबुक या मोगलीच्या cartoon series ने पहिल्यांदाच अगदी थोडकीशीच ओळख झाली. रानकुत्रा या प्राण्याशी... एका अत्यंत हुशार जंगली शिकाऱ्याची भेट तिथे झाली. याचा पूर्ण जंगलावर दबदबा असल्याचं, तो एक क्रूर शिकारी असल्याचं त्यात कधीकाळी पाहिलं, ऐकलं होतं; मात्र जसजशी सह्याद्रीच्या जंगलांशी, तिथल्या वन्यप्राण्यांशी ओळख होऊ लागली, जंगलात पाड्यांवर राहणाऱ्या, रानमाणसांशी संवाद होऊ लागले, माहितीची देवाणघेवाण होऊ लागली तसतसं लक्षात आलं की, अतिशय सुंदर आणि माणसासाठी अत्यंत निरूपद्रवी असा हा जीव आहे. या प्राण्याला जंगलातील भटकंतीदरम्यान कितीतरी वेळा समोरून पाहिलं, अनुभवलं आणि प्रत्येकवेळी नव्याने प्रेमात पडत राहिले. इतर सर्व जंगली प्राण्यांप्रमाणेच रानकुत्रादेखील प्रभावी, लक्षवेधी प्राणी असल्याचं जाणवलं. आज २८ मे या जागतिक रानकुत्रा दिवसाच्या निमित्ताने...
- राणी प्रभुलकर (अरणी)
-----
रानकुत्रा संकटात न येण्यासाठी...

रानकुत्रा, कोळसुंदे, कोळशिंदे, कोळीसनं, कोळसून आणि अशा बऱ्याचशा स्थानिक नावांनी ओळखला जाणारा, कळपाने राहणारा एक जंगली कुत्रा.
सह्याद्रीच्या घनदाट अरण्यांमध्ये बागडणारा, एखाद्या राजासारखा इथे वर्षानुवर्षे वास्तव्यास असणारा हा देखणा मासभक्षी सस्तन प्राणी. चपळ आणि एक अतिशय हुशार शिकारी आणि सध्याच्या काळातील एक दुर्लक्षित व संकटग्रस्त प्रजाती. कोळसुंद्यांना इंग्रजीमध्ये Dhole (ढोल) किंवा Asiatic Wild Dog असे म्हणतात तसेच शास्त्रीय भाषेत Cuon alpinus (क्यूऑन अल्पायनस) असे त्यांचे नाव आहे. झुपकेदार काळी गोंडस शेपटी ऐटीत मिरवणारा, तांबूस लाल रंगाचा कोट धारण केलेला, साधारण पाळीव कुत्र्यांच्याच ऊंची, अंगकाठीचा, गोलसर उभारलेले कान असणारा, कोळसुंदा हा एक अत्यंत चपळाईने पळणारा गूढ प्राणी आहे. वाघा-बिबट्याप्रमाणेच अन्नसाखळीमध्ये उच्च स्थानावर असणारा व परिसंस्थीकिय समतोल राखण्यात अतिशय महत्वाची भूमिका बजावणारा हा सुंदर जीव. सांबर, डुक्कर, भेकर यांसारख्या प्राण्यांवर नैसर्गिकरित्या नियंत्रण राखण्यात या प्राण्याची विशेष भूमिका असते.
सह्याद्रीत व सह्याद्रीच्या पायथ्याला राहणारे धनगर समाजातील व आदिवासी समाजातील बांधव ज्यांचा आजच्या काळातही जंगलांशी संबंध आहे, वावर आहे, उपजिविकेसाठी जंगलांवर अवलंबत्व आहे अशा बांधवांव्यतिरिक्त इतर ठिकाणी हा प्राणी फारसा ऐकिवात (प्रसिद्ध) नसल्याचे दिसून येते. कदाचित हेच कारण असावे की, आजच्या घडीला जगभरातील प्रजननक्षम रानकुत्र्यांची संख्या ही केवळ २०००-२५०० इतकीच उरली आहे; मात्र तरीदेखील त्याबाबत तसा गवगवा होताना दिसत नाही.
२०२१ ला ''जागतिक रानकुत्रा दिवस'' प्रत्यक्षात साजरा करण्यास सुरवात झाली. जगभरातील बहुतेक ठिकाणी या प्राण्यासाठीचा दिवस वेगवेगळ्या जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. २०१५ या वर्षी कोळसुंद्यांना आययूसीएन (IUCN) च्या संकटग्रस्त (endangered) प्रजातींच्या श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आले. या प्राण्याचा अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे. अधिवासांचे होणारे रूपांतर, विखंडन आणि वनांमध्ये भक्ष्याचे घटत जाणारे प्रमाण या काही प्रमुख चिंतेच्या बाबी आहेत. याच परिणामी, रानकुत्रे आता सह्याद्रीच्या पायथ्याला तसेच कोकणातही येताना, वावरताना दिसून येत आहेत. रानकुत्रे आणि जंगलात राहणाऱ्या, पाड्यावरच्या रानमाणसांमध्ये अद्याप तरी बऱ्याच अंशी सहजीवन पाहायला मिळतं आहे, ही एक जमेची बाजू.
सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्था, गेली काही वर्षे चिपळूणमधील सह्याद्रीतील धनगरपाडे व आदिवासी पाड्यांवरील बांधवांना सोबत घेत जंगल व वन्यजीवांच्या संवर्धनादृष्ट्या प्रयत्न करत आहे. हे काम करत असताना त्यांच्याशी संवाद साधत असताना सध्या हे स्थानिक बांधव रानकुत्र्यांनी त्यांच्या दुभत्या गुरांना मारल्याचे सांगतात. भलेही अद्याप या माहितीला तक्रारीचे स्वरूप आले नसले तरी भविष्यात त्याची शक्यता नाकारता येत नाही. जसे बिबट्याने दुभती गुरं मारल्यावर त्याची योग्य नुकसानभरपाई वनविभागाकडून योग्य वेळेत मिळते तशी रानकुत्र्यांनी मारल्यावरही भरपाई मिळू शकते याबाबत अजून पुरेशी माहिती सर्वत्र पोहोचली नाही आहे, हे बऱ्याचदा चर्चेदरम्यान लक्षात येते. त्यामुळे यावर उपाय म्हणून आजच्या दिवसाचे औचित्य साधत या भागातील विविध पाड्यांवरील बांधवांसोबत या संस्थेने चर्चासत्रे आयोजित केली आहेत. रानकुत्र्यांकडून यापुढेही स्थानिकांची पाळीव दुभती जनावरे मारली गेली, त्यांचे नुकसान झाले तरीही वेळीच नुकसान भरपाईसाठीची कार्यवाही करून ते योग्य ती भरपाई मिळवू शकतील. स्थानिक आणि वन्यजीव यांमधील सहजीवन राखण्यासाठी यातून हातभार लागेल.
----------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com