पावस ः घराच्या पडवीमध्ये सापडला मेलेला बिबट्या

पावस ः घराच्या पडवीमध्ये सापडला मेलेला बिबट्या

rat27p8.jpg ः
05352
पावसः मृतावस्थेत सापडलेला बिबट्या.
-----------
पडवीमध्ये सापडला मृत बिबट्या
गावडेआंबेरेतील प्रकार; भूकबळी असल्याचा अंदाज
पावस, ता. २७ः रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे- भोसलेवाडी येथील घराच्या पडवीमध्ये मृत बिबट्या सापडला आहे. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर अनेकांनी बघण्यासाठी गर्दी केली. वनविभागाने पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी मृत बिबट्याला ताब्यात घेतले. भूकबळी किंवा हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.
गावडेआंबेरे भोसलेवाडी येथील गणपत बावकर यांच्या घराच्या पडवीमध्ये मृत बिबट्या सापडला. बावकर यांनी पाठीमागील पडवीमध्ये जमीन केल्यामुळे प्लास्टिकचा कागद त्यावर टाकला होता. सकाळी साडेसहा वाजता तो काढण्यासाठी गेले असता बिबट्या मृत झालेला दिसून आला. घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांचा मुलगा जगदीश याने तातडीने पोलिस पाटील लाड यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिस पाटील यांनी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये खबर दिल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा नंबर देण्यात आला. त्यानंतर पोलिस पाटील लाड यांनी वनविभागाला कळवल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला व बिबट्याला शवविच्छेदनसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. मृत बिबट्या सहा ते सात महिन्याचा होता, असे वनविभागाने सांगितले. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप कळू शकले नाही.
रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी बाहेर आहे; पण मला याबाबत कर्मचाऱ्यांनी खबर दिली. सात महिन्याचा बछडा आहे. भूकबळी किंवा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत झाला असावा. तरी शवविच्छेदनानंतर हे स्पष्ट होईल. त्यासाठी त्याचे अवशेष तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com