
चिंदरमध्ये भाजपतर्फे रस्ताकामांचा प्रारंभ
05375
चिंदर ः गावातील विविध विकासकामांचा प्रारंभ भाजपच्यावतीने करण्यात आला.
चिंदरमध्ये भाजपतर्फे रस्ताकामांचा प्रारंभ
आचरा : चिंदर गाव विकासात अग्रेसर ठेवण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. येथील सातेरी मंदिर पूर्व चिंदर व सातेरी मंदिर पश्चिम अशा दोन्ही रस्त्यांच्या कामांचा आज प्रारंभ झाला. पूर्व भाजप नेते मंगेश गावकर व पश्चिम रस्त्याचा अण्णा पुजारे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, भाजप प्रभारी आचरा संतोष गावकर, प्रभारी सरपंच दीपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी घाडी, अरुण घाडी, माजी सरपंच भालचंद्र खोत, पोलिसपाटील दिनेश पाताडे, राजू परब, दादू घाडी, एकनाथ पवार, बूथ अध्यक्ष दिगंबर जाधव, रवी घागरे आदी उपस्थित होते. गेली दहा वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या रस्ताकामांचा प्रारंभ झाल्यामुळे गावठणवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार नीलेश राणे यांचे त्यांनी आभार मानले.
................
पालकमंत्री चव्हाण उद्या जिल्ह्यात
सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण सोमवारी (ता. २९) जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः सोमवारी (ता. २९) सकाळी ११ वाजता ओरोस येथे आगमन व सिंधुदुर्ग भरडधान्य अभियान कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी १२.३० वाजता हळद लागवड संदर्भात नियोजबाबत बैठक, ३ वाजता कणकवली येथे ‘मोदी @ ९’ अभियानांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्रातील उपक्रमासंदर्भात नियोजन बैठक, सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद. मंगळवारी (ता. ३०) सकाळी ८ वाजता झाराप येथे मुंबई-गोवा महामार्ग पाहणीस सुरुवात.